Cotton Market News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. या हंगामाच्या अंतिम टप्प्यात आता पांढरे सोने चमकले आहे. पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे भाव हंगामा सुरू झाल्यापासूनच खूप कमी होते. कापसाचा अंगावर विजयादशमीला सुरू होत असतो. यावर्षी देखील नवीन कापूस विजयादशमीला बाजारात आला होता.
मात्र या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. अनेक ठिकाणी कापसाचे भाव हमीभावापेक्षा देखील कमी होते. कापूस हे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागातील प्रमुख पीक आहे. याशिवाय राज्यातील खानदेश विभागातील जळगाव व इतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात देखील कापसाची सर्वात जास्त प्रमाणात शेती केली जाते. जळगाव ला कापसाचे आगार म्हणून देखील ओळखले जाते
यंदा कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता कापसाचा हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे. यामुळे बाजारपेठेमध्ये कापसाची आवक देखील कमी झाले आहे.
हवा कमी झाली आहे आणि मागणी वाढली आहे अशा परिस्थितीत सध्या बाजार भाव मध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे. अव कमी झाल्यामुळे व कापसाची मागणी वाढल्यामुळे बाजारभावात सुधारणा पाहायला मिळत आहे. मात्र बाजार भाव सुधारणा झाली असली तरी देखील आता शेतकऱ्याकडे फारसा कापूस शिल्लक नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही.
सध्या कापसाचे बाजार भाव पाहायला गेले तर पश्चिम विदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7450 ते 7600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. यावर्षी केंद्र सरकारने कापसाला 7020 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे.
अर्थातच सध्याचा बाजार भाव हा हमीभावापेक्षा जास्त आहे. यामुळे कापूस उत्पादकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. मात्र कापसाचा हंगामा हा अंतिम टप्प्यात आला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस विकला असल्याने कापसाच्या भावात झालेल्या वाढीचा फायदा नेमकं कोणाला होणार? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पण कापसाचे भाव सुधारले असल्याने अन कापसाला हमीभाव पेक्षा अधिक दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांना काहीसा प्रमाणात समाधान मिळण्याचे पाहायला मिळत आहे. Cotton Market News
हे पण वाचा:- शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी..! आता तुम्हाला मोफत रेशनसोबत हे 4 नवीन फायदे मिळणार
2 thoughts on “पांढरे सोने चमकले..! कापसाचे भाव सुधारले, पण….”