Thursday

13-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांनो याकडे लक्ष द्या ! भाववाढीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कापूस हा टप्प्याटप्प्याने विक्री करावा लागणार आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton market news: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, की कापूस या पिकाला किती भाव आहे. पण त्याच कापूस पिकाला जर चांगला भाव मिळण्यासाठी तुम्हाला या कापूस पिकाची टप्प्याटप्प्याने विक्री हे करावी लागणार आहेत.

भारत देशामधील बाजारात सरकीचे भाव हे स्थिर असले, तरी जागतिक कापूस बाजारामध्ये रुईच्या नावात थोडी तेजी तर आली आहे. यामुळे या तीन महिन्यांपासून दबावत असलेले कापूस पिकाचे भाव हे हळूहळू आता वाढू लागले आहेत. पण, सध्याच्या कापसाच्या या भावाने प्रति क्विंटल 7000 रुपयांची पातळी ही ओलांडली असून ही पातळी आता 8 हजार रुपयांच्या आसपास जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. या भाव वाढीचा फायदा घेण्यासाठी आता शेतकऱ्यांनी कापूस हा टप्प्याटप्प्याने विक्री करणे आवश्यक आहे.

या जागतिक बाजारामध्ये मागील गेल्या पंधरवड्यापासून रुईचे भाव वाढायला सुरुवात ही झालेली आहे. यामध्ये सरासरी 57 हजार रुपये प्रति खंडी असलेले रुईचे भाव हे हळूहळू 63 हजार रुपये प्रति खंडिवर आता पोहोचलेले आहेत. एकदाच परिणाम देशांतर्गत बाजारांमधील कापसाच्या या भाव वाढीवर झालेला आहे. पण सध्या महाराष्ट्रातील पावसात भिजलेल्या कापसाला 6 हजार 800 ते 7 हजार रुपये अशा चांगल्या प्रतीच्या कापसाला 7 हजार ते 7,500 प्रतिक्विंटल प्रमाणे भाव भेटत आहे.

तर मध्यंतरी या कापसाची आवक थोडीफार वाढली. व भाव देखील कमी झाले होते. पण या चालू हंगामामध्ये आपल्या भारत देशातील 200 लाख गाठी कापूस बाजारामध्ये आला असून, आता सध्या रोज आवक ही आठ ते नऊ लाख क्विंटल एवढी आहे. यामध्ये व्यापाऱ्यांकडील पैशाचे रोटेशन हे विचारात घेता भाव वाढ टिकून ठेवण्यासाठी ही आवक वाढवून न देता कमी करणे. अथवा, जागीच ठप्प करून ठेवणे आवश्यक आहे.

निर्यात स्वस्त आयात महाग या जागतिक बाजार व इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतातील कापसाचे भाव हे कमी आहेत. म्हणून या भारत देशातील वस्त्रोद्योग आणि रोहित किंवा सूत हे आयात करण्याचा आता विचार केल्यास त्यांनाही आयात फारच महाग पडणार आहे. कारण दुसरीकडे या जगात कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे व मागणी देखील हळूहळू वाढत असल्यामुळे भारतदेशाला कापूस देण्याची संधी ही चालून आलेली आहे. Cotton market news

भारताने ही संधी आता कॅश केल्यास कापसाचे भाव हे 8 हजार रुपयांची प्रतिक्विंटलची पातळी व ओलांडू शकते. यामध्ये त्याचा आर्थिक फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो. मागणी मध्ये वाढ सध्या कापूस विक्री हंगामामधिल अतिशय टप्प्यात आहे. भारत देशातील वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या या कापसाच्या मागणीमध्ये वाढ ही होत आहे. या मार्च महिन्यापासून पुढे ही मागणी आणखीन जास्त वाढणार आहे.

आयातीतील कापूस हा महागात पडणार असल्यामुळे भारतीय वस्त्रोद्योगाला देशांतर्गत बाजारामधुन रुई व सुताची खरेदी ही करावी लागणार आहे. आगामी काळ निवडणुकीचा असल्यामुळे टेक्सटाईल लॉबीने या कापसाचे भाव नियंत्रणामध्ये आणण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या प्रयत्नांना फारसे यश हे येण्याची शक्यता नाही.

तसेच शेतकऱ्यांनी या वाढीव भावाचा फायदा घेण्यासाठी आधी बाजारातील भावाचा हा आढावा घ्यावा. व कापूस एक मुस्त न विकता टप्प्याटप्प्याने या कापसाची विक्री ही करावी. आणि कापूस विकण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात शेवटचा आठवडा व मार्च आणि एप्रिल असे तीन टप्प्यात गरजेनुसार नियोजन हे करावे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कापूस भावात मोठी वाढ, पहा राज्यातील आजचे बाजार भाव

अश्याच नवनवीन माहिती साठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *