Cotton Market News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेले बरेच दिवसात कापसाचा भाव कमीच आहे. पण येणाऱ्या काही दिवसात कापसाचे भाव पुन्हा वाढण्याची बातमी समोर आली आहे. नेमकी किती वाढणार कापसाचा बाजार भाव? नेमकं का वाढणार कापसाचा बाजार भाव? व नेमकं कधी वाढणार कापसाचा बाजार भाव? त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या विभागात कापसाचे मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते. अशा वेळेत कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडनाशी झाली आहे. कापसाचा हमीभाव 7020 प्रतिक्विंटल असताना देखील बाजारात कापसाला भाव 6000 ते 6800 रुपयापर्यंत मिळत आहे. व्यापारी अनेक कारणे देऊन कापसाचे भाव दबावा ठेवत आहेत.
मात्र यावर्षी मध्यंतरीच्या काळात पावसाच्या खंडामुळे कापसाचे उत्पन्न कमी झाले शेतकऱ्याने पिकावर केलेल्या करतो देखील उत्पन्नातून मिळत नाही त्यामुळे शेतकरी आपला कापूस चांगला भाव मिळेपर्यंत आपला कापूस घालणार नाहीत यामुळे दर्जेदार कापसाचे उपलब्धता होत नसल्यामुळे बाजार भाव लवकरच वाढण्याची शक्यता तज्ञ लोकांनी सांगितली आहे. येत्या काही दिवसात कापसाचे भावात सुधारणा होण्याचा अंदाज आहे.
कापसाचे भाव लवकरच सात हजार रुपये याच्यापुढे जातील असे कापूस विपुल क्षेत्रातील तज्ञ सांगत असल्याची माहिती समोर आले आहे त्यातील काही तज्ञांनी थेट 7800 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल असे देखील सांगितले. असा अंदाज वर्तवला आहे. परंतु हा अंदाज खरा होतो का? खरा झाला तर कधी होणार? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहेत. Cotton Market News
हे पण वाचा:- आता सरकार या राज्यांमध्ये जनावरांचे शेड बांधण्यासाठी 1 लाख 60 हजार रुपये देणार, असा करा अर्ज