Cotton Market Maharashtra : कापसाला पांढरे सोन म्हणून ओळखले जाते. या पिकाची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील कापसाचे पीक उत्पादित केले जाते. खानदेशातील जळगाव जिल्ह्यात तर कापसाचे आगार म्हणून ओळखला जातो.
या संबंधित भागाचे शेतकऱ्यांचे कापसाच्या पिकावर अर्थकारण अवलंबून असते. गेल्या हंगामापासून मात्र कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी ठरू लागले आहे. एक तर कृषी बाबत लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस वाढत आहे. बी-बियाणे, खत, औषध यांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. व आता मजुरीचे दर देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहेत.
अशा परिस्थितीत कापूस पीक उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा उत्पादन खर्च करावा लागत आहे. या पिकासाठी शेतकऱ्यांना जास्तीचे मजूर लागत आहे. पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मंजूर टंचाई होत आहे .म्हणून मंजूर टंचाईचा देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आहे. मंजूर टंचाई होत असल्याने शेतकऱ्यांना अधिकची मंजुरी देऊन मजूर बोलावे लागत आहे. परिणामी आता हे पीक मोठे खर्चिक बनले आहे.
तथापि मालाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी यंदा या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. कमी पाऊस झालेल्या असतानाही कापूस लागवडीचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. याचा मात्र, शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कारण की यंदा कमी पावसामुळे उत्पादन मोठी घट झाले आहे.
शिवाय बाजारात कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. गेल्या आठवड्यात तर कापसाला मात्र 7000 ते 7200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला होता. अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी एक दिलासा बातमी समोर आलेली आहे.
काल झालेल्या राज्यातील कापसाला साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बोरेगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला कमाल सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.
तसेच या मार्केटमध्ये काल कापूस किमान सात हजार रुपये आणि सरासरी 7200 रुपये प्रति क्विंटल यात रात्री केला गेला आहे. बाजारात थोडीशी वाढ झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
परंतु कापसाला किमान हजार ते दहा हजार दर मिळावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे त्यापेक्षा कमी भाव मिळाला तर हे पीक कोणत्याही परिस्थितीत पडत नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे यामुळे आता भविष्यात कापसाला काय भाव मिळणारे यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून राहणार आहे.