Cotton Market | कापूस हे महाराष्ट्राचे मुख्य पीक आहे. मराठवाडा खानदेश विदर्भ या भागात कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी कापसाला पांढरे सोने असे वर्णन दिले आहे. या पांढरे सोन्याने शेतकऱ्यांना अनेकदा रडवले आणि भरघोस नफा ही दिला आहे. परंतु यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा पांढऱ्या सोन्याला अपेक्षित असा भाव मिळेल. परंतु बाजारात हमीभाव पेक्षा भाव कमी मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडला आहे.
(शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा)
परंतु शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्याचे पांढरे सोनं चमकणार अशी आशाची किरण दिसू लागली आहे. सध्या बाजार भाव दबावत असतानाही शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे कारण म्हणजे CCI च्या माध्यमातून कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. CCI च्या माध्यमातून कापसाला योग्य भाव मिळाला असा अशा व्यक्त होत आहे.
मराठवाड्यामधील परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये CCI च्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या भागाचे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला भाव मिळतील अशी आशा व्यक्त होत आहे.
अनेक काळापासून CCI ने परभणी मध्ये कापूस खरेदी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला चांगला दर मिळेल आणि केलेला खर्चही निघेल अशा अपेक्षा आहे. या बातमीमुळे लवकरच मार्केटमध्ये कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
परंतु यापूर्वी CCI ने कर्ज न केल्याने यावर्षी उत्पादन कमी असताना शेतकऱ्यांना चांगला दर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. परंतु सी सी आय बाजारात प्रवेश करणारी गतिशीलता बदलू शकते. शेतकऱ्यांच्या सहभागाने दर वाढेल अशी अपेक्षा आहे.
परभणी मध्ये लवकरच सीसीआयची खरेदी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय एजन्सी कडून मिळालेला हा पाठिंबा या प्रदेशातील कापूस उत्पादनासाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे जे वाजवी किमतीसाठी प्रयत्नशील आहेत.
सीसीआयने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे खरेदी केली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने पुन्हा एकदा चमकेल का ? याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.