Cotton Market | कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे नगदी पीक आहे. मराठवाडा विदर्भ खानदेश या भागांमध्ये लागवड केली जाते. या भागातील शेतकऱ्यांचे कापूस पिकावर ती अर्थकारण अवलंबून आहे. बऱ्याच दिवसापासून कापूस भाव दाबावत असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे.
मानसून नंतर पावसामुळे बोंड आळी वाढल्यामुळे देशांतर्गत प्रक्रिया कामे चांगल्या कापसाचे उपलब्ध कठीण वाटत आहे. त्याच्याच परिणामी फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्चमध्ये कापसाच्या घरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. येत्या काळामध्ये कापसाचे दर सात हजार रुपयांपेक्षा अधिक राहतील असा अंदाज क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.
बाजारामध्ये अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा चांगला कापूस घरामध्ये साठवून ठेवला आहे. बाजारामध्ये कापूस उपलब्ध होत नसल्याने कापूस दरामध्ये मार्चपर्यंत सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कापसाचा हमीभाव सात हजार वीस रुपये असताना सुद्धा खुल्या बाजारामध्ये कापसाला सहा हजार ते सहा हजार आठशे असा दर मिळत आहे. चांगला कापूस नसल्यामुळे दर दबावात असल्याचे सांगण्यात येत आहे.
तज्ञांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे चांगल्या कापसाचे आवक होत नसल्याने मार्चपर्यंत चांगला कापसाचे आवक झाल्यानंतर कापसाच्या बाजारभावामध्ये वाढण्याची शक्यता जाणकारांच्या मते वर्तवण्यात येत आहे.
परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात सुधारणा झाली तसेच वाजे बाजारामध्ये देखील कापसाच्या बाजारामध्ये सुधारणा आणि लवकरच बाजार समितीमध्ये देखील भाव वाढ होणार असल्याचे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
आता मिळालेल्या माहितीनुसार बळीराजाला अपेक्षित असा भाव मिळतो का याकडे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.