Success Story | फक्त ₹2000 हजार रुपयात सुरू केला व्यवसाय, आज पोहोचलाय 30 लाखांवर शेतकऱ्यांची प्रेरणादायी स्टोरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Success Story | तुम्ही देखील व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, परंतु कोणता व्यवसाय आणि कसा करावा जर याची माहिती नसेल तर एक उत्तम उदाहरण म्हणजे ओडिशातील एका छोट्या गावातील जितेंद्र मोहराणा या तरुणाने कोरोना काळात असा एक नवीन निर्णय घेतलाय की आज ज्याचं नाव संपूर्ण भागात चर्चेचा विषय बनला आहे. त्यावेळेस सगळीकडे लॉकडाऊन होतं सर्व कामधंदे बंद होते, नोकऱ्या बंद होत्या, सर्व काही ठप्प झालं होतं. पण या पाठ्याने हार मानली नाही, फक्त दोन हजार रुपयात गुंतवणूक करून त्याने सुरू केलेला गांडूळ खत बनवण्याचा छोटा व्यवसाय आणि आज त्याची खुशी ऍग्रो या नावाने चालणारा उद्योगाची उलाढाल 30 लाखांवर पोचले आहे. Business Success Story

त्याने सुरुवातीला आपल्या घराच्या मागच्या बागेसाठी खत बनवायला सुरुवात केली. किचन गार्डन साठी हे काम जसं जसं वाढत गेलं, तसं तसं त्याला जाणवलं की यामध्ये मोठी संधी आहे. गाईचं शेण, सुकलेली पाने, थोडं ओलसर वातावरण एवढेच साहित्य आणि मेहनत. पण त्यातून निर्माण झालेलं खताला गावभर मागणी वाढली. पहिल्या महिन्यात त्याने 10- 15 किलो विकलं, पण नंतर ऑर्डर्स छत्तीसगड पर्यंत पोहोचल्या!

त्याचं खुश ऍग्रो नावाचा फार्म आज 15हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. गावात जे बेरोजगार तरुण होते, त्यांना त्याच्या कामावर घेतलं. हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या जीवनात बदल घडवला. तू स्वतः आता फक्त व्यावसायिक नाही, तर प्रशिक्षक बनला आहे. शेतकऱ्यांना गांडूळ खत कसा तयार करायच, कोणती प्रक्रिया पाळायची, त्यातील काळजी काय घ्यायची हे सर्व काही तो शिकवतो.

त्यांनी काही सोशल मीडिया वरती व प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तो सांगतो रासायनिक खताने माती मरते, पण सेंद्रिय खतांनी ती जिवंत राहते. त्याच्या या विचारांनाच अनेक शेतकरी प्रेरित झाले आहेत. त्याचे उत्पादन आता कालहंडी, कोरापूट, बिलगिर आणि आस्वाच्या जिल्ह्यात विकल जात. त्यांच्या ब्रँड वर लोकांचा विश्वास बसला आहे.

सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे, तो अजून थांबलेला नाही. आज लिक्विड बायो फर्टीलायझर तयार करण्याची त्याची तयारी सुरू आहे. इनोव्हेशन आणि महिन्यात असेल, तर कोणतीही गोष्ट शक्य आहे अस तो नेहमी म्हणतो.

या तरुणाचा प्रवास प्रत्यक्ष शेतकरी, प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कारण ज्यांच्याकडे भांडवल नव्हतं, त्या माणसांना विचार आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचा साम्राज्य निर्माण केला आहे. आज ज्याचं खत फक्त शेतीला नाही तर गावातला प्रत्येक तरुणाला पोसतय

हे पण वाचा | Success Story : …..आधुनिक शेतीतून शेतकऱ्यांनी कमावला भरघोस नफा

Leave a Comment

error: Content is protected !!