Budget 2025: देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. म्हणजेच उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024 25 चे आर्थिक संरक्षण सभागृहात मांडणार आहेत. यावेळी अर्थमंत्र्यांनी ज्या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे त्याचा उल्लेख केला आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे सुधारित व्याज अनुदान योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
प्रतीक्षा संपली! शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता, पहा सविस्तर..
शेतकऱ्यांच्या आर्थिक संरक्षणासाठी आर्थिक वर्ष 2025 पासून सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत दावे आणि देखे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी किसान कर्ज पोर्टल द्वारे आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत 1 लाख कोटीपेक्षा जास्त किमतीचे दावे निकाली काढण्यात आले आहेत. सध्या सुधारित व्याज अनुदान योजना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत किसान कर्ज पोर्टलच्या मदतीने सुमारे 5.9 कोटी शेतकरी लाभ घेत आहेत.
ही योजना शेतकऱ्यांना पीक आणि संबंधित कामासाठी सवलतीच्या दरात अल्पमुदतीत कृषी कर्ज देते. या अंतर्गत तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज सात टक्के व्याजदराव मिळते. वेळेवर भरणा करण्यासाठी अतिरिक्त तीन टक्के सबसिडी सोबत दर चार टक्के पर्यंत कमी केला जातो. Budget 2025
2025 चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सर्व शेतकरी विशेषता लहान व अल्पभूधारक शेतकरी आणि समाजातील वंचित घटकांना या कर्जाचा लाभ घेता येतो. शेतकऱ्याचे उत्पन्न आणि कृषी उत्पादकात वाढ होण्यासाठी हे महत्त्वाचे भूमिका बजावते. आर्थिक सर्वेनुसार मार्च 2024 पर्यंत देशात सात कोटी 75 लाख किसान क्रेडिट कार्ड खाती तयार करण्यात आली आहेत. तर त्यांच्यावर 9.81 लाख कोटी रुपयांची कर्ज आहे. 31 मार्च 2024 पर्यंत मत्स्य व्यवसायासाठी एक लाख 24 हजार केसीन क्रेडिट कार्ड आणि पशुसंवर्धन उपकरणासाठी 44 लाख 40 हजार केशर क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पेन्शन सुविधा देणाऱ्या पीएम किसान सन्मान नधी आणि प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसारख्या केंद्र सरकारच्या योजनाही शेतकऱ्यांना मोठा फायदा देत आहेत. अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेतला असून, 23 लाख 61 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेतला आहे.