Saturday

15-03-2025 Vol 19

सोने, चांदी, मोबाईलच्या किमती कमी! अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग झाले जाणून घ्या संपूर्ण यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget 2024: नमस्कार मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर सोने आणि चांदीही स्वस्त झाले आहे. आज अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तूंबाबत मोठ्या दिलासादायक घोषणा केल्या आहेत.

सोने, चांदी आणि प्लॅटिनम स्वस्त

सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांवर आणली आहे, ज्यामुळे ते स्वस्त होणार आहे. प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटीही कमी करण्यात आली असून, त्यानंतर ते स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याशिवाय प्लॅटिनमसाठी कस्टम ड्युटी 6.4 टक्के करण्याबाबतही त्यांनी माहिती दिली. सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या किमती कमी होतील.

मोबाईल फोन-चार्जर स्वस्त

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की मोबाईल फोन आणि चार्जरवरील मूळ कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईलच्या किमतीत कपात होणार आहे. Budget 2024

स्वस्त लिथियम बॅटरीमुळे ईव्हीला चालना मिळेल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही सौर पॅनेल आणि लिथियम बॅटरी स्वस्त झाल्याबद्दल बोलले, ज्यामुळे फोन आणि वाहनांच्या बॅटरीच्या किमती कमी होतील. याशिवाय, ई-कॉमर्स कंपन्यांचा TDS दर 1 टक्क्यांवरून 0.1 टक्के करण्यात आला आहे. ते जवळपास शून्यावर आले आहे.

कॅन्सरच्या औषधांवर अर्थमंत्र्यांनी दिला मोठा दिलासा

अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की कर्करोगाच्या उपचारासाठी तीन औषधांना मूलभूत सीमा शुल्कातून सूट दिली जाईल. एक्स-रे मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरील बेसिक कस्टम ड्युटी देखील बदलली जाईल. या घोषणेची अंमलबजावणी झाल्यानंतर त्यांच्या किमतीही खाली येतील. याशिवाय सरकारने फेरोनिकेल आणि ब्लिस्टर कॉपरवरील बेसिक कस्टम ड्युटी हटवली आहे.

अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर ही उत्पादने महाग होणार आहेत

  • अमोनियम नायट्रेटवरील कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरून 25 टक्के करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
  • विशिष्ट दूरसंचार उपकरणांवरील बेसिक कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आली आहे.

बजेटमध्ये हे स्वस्त झाले

  • मोबाईल आणि मोबाईल चार्जर
  • सौर पॅनेल
  • चामड्याच्या वस्तू
  • दागिने (सोने, चांदी, डायमंड, प्लॅटिनम)
  • स्टील आणि लोखंड
  • इलेक्ट्रॉनिक्स
  • समुद्रपर्यटन प्रवास
  • सी फूड
  • चपल
  • कर्करोगाची औषधे

हे बजेटमध्ये महाग झाले

  • स्पेसिफाइड दूरसंचार उपकरण
  • पीव्हीसी प्लास्टिक

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

3 thoughts on “सोने, चांदी, मोबाईलच्या किमती कमी! अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त आणि काय महाग झाले जाणून घ्या संपूर्ण यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *