Bima insurance company: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सुरुवातीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने तसेच मध्यंतरी काळात पडलेल्या पावसाच्या खंडाने तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या 70 टक्के पिकाची नुकसान झाले आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिके आहेत.
राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्याचे पिक विमा वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांनी पिक विमा चा मार्ग निवडला होता. सरकारने एक रुपयाची पिक विमा भरण्याची योजना चालू केली होती. या योजनेमुळे भरपूर शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. पिक विमा वाटायचे राहिलेले जिल्हे म्हणजे नांदेड जिल्हा प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सरासरी 96 महसूल मंडळांमध्ये सोयाबीन पिक विमा बाकी राहिला आहे.
आता पिक विमा वाटायचे बाकी असलेला नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यात पिक विमा वाटपाला आता गती मिळाली आहे सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंजूर केली होती. या घटकांनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 214 कोटी 62 लाख रुपयांचा आग्रामी पिक विमा वाटप झाल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.
हे पण वाचा: रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे/कमी करणे, नवीन रेशन कार्ड कसे काढायचे? पहा रेशन कार्ड बद्दल सर्व माहिती
Bima insurance company
सर्वत्र जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम 25 टक्के रक्कम जमा करण्यात आले आहे. यामध्ये काही कारणास्तव मागे राहिलेले जिल्हे म्हणजे नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंदोलनाचा वेढा हाती घेतला व सरकारला पुन्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करून पिक विमा वाटपाला गती द्यावेच लागली.
अग्रीम पिक विमा वाटप करण्याचे काम पुढील हप्त्यामध्ये पूर्ण होण्याची संकेत पिक विमा कंपनीने दिले आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपनी वरती दबाव निर्माण करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करा असे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करत किंवा कंपन्यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिक विमा वाटपास सुरुवात केली आहे.
कृषी विभागामार्फत दिवाळीच्या दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले होते परंतु तसे घडले नाही पिक विमा कंपनीने राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा पासून दूर ठेवले होते. त्यामुळे राज्यातील पिक विमा जमा होण्यास बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन वर्षाची वाट पाहावी लागली आहे राज्यातील बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची आग्रीमी 25% रक्कम जमा झाली आहे.
हे पण वाचा;-
💁♂️👇
सोयाबीन बाजार भावत मोठी वाढ..! पहा आजचा सोयाबीन बाजार भाव