Beneficiary Status: देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. या योजनेअंतर्गत 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मागील अनेक दिवसापासून पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या दिवसाची वाट पाहत आहेत. पी एम किसान योजनेच्या 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेअंतर्गत 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम शहरांमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. त्यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. प्रधानमंत्री किसान योजनेचा 19 वा हप्ता येत्या 24 फेब्रुवारी रोजी जारी केला जाणार आहे. प्रधानमंत्री मोदी बिहार मधून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. Beneficiary Status
पी एम किसान योजनेअंतर्गत 2019 पासून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात महाडीबीटी द्वारे 3.46 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी पाठवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 11 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना अठराव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. तसेच केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नमुळे 18 व्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 9.58 कोटी एवढी झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये दोन हजार रुपये प्रमाणे जमा केले जातात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारच्या वतीने केला जातो. या योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना तीन समान हफ्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये याप्रमाणे एक हप्ता जमा केला जातो. या योजने अंतर्गत आत्तापर्यंत 18 हप्त शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार प्रत्येक हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी द्वारे ट्रान्सफर करते. शेतकरी योजनेची संबंधित कोणतीही माहिती पी एम किसान योजना बोट किसान ई मित्रा द्वारे मिळवू शकतात.
One thought on “प्रतीक्षा संपली! शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता, पहा सविस्तर..”