Weather forecast: देशभरासह अनेक राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे फारच मोठे नुकसान केले आहेत. गेल्या महिन्यात महाराष्ट्र सह, अनेक राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अशातच, नवीन वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या स्वागताला, काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे.
नुकत्याच पूरस्थितीतून बाहेर पडत असलेल्या, तमिळनाडूतील किनारपट्टीवर पुन्हा एकदा 30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचबरोबर हरियाणा, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश व पंजाब मध्ये ही पावसाची शक्यता फार कमी प्रमाणातच आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यातं आली आहे. तसेच पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, मधीलही काही भाग आणि दिल्ली एनसीआर मध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्स चा परिणाम दिल्ली एनसीआर मध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. स्कायमेट वेदरने दिलेल्या रिपोर्टरनुसार, पंजाब मध्ये अनेक भागांमध्ये 31 डिसेंबर पर्यंत दाट धोके कायम राहतील. दिल्ली, चंदीगड, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात 29 डिसेंबर पर्यंत दाट धोक्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
आज बुधवार : उत्तर राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशच्या विविध भागात दाट धोक्यांची चादर दिसून येते. स्कायमेट वेदर रिपोर्टर नुसार, तमिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. देशातील उर्वरित भाग 29 डिसेंबर पर्यंतच कोरडे हवामान राहतील. 29 डिसेंबरच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयात पाऊस आणि आणि हिम वर्षाव होऊ शकते. गंगा मैदानात ते दाट धुके अपेक्षित आहेत.
तर महाराष्ट्रात काय स्थिती ?
राज्यात किमान तापमानात वाढ होत असली, तरी राज्यात गार गारठा कायम आहे. राज्यात किमान तापमान पारा दहा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नगर येथे 10.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील 24 तासांमध्ये किमान तापमानात कमी जास्त होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र गारठा कायमं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वर्षाच्या शेवटी मुंबई, ठाणे, पालघर आणि पुण्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.