Annapurna Yojana : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळवायचा असेल तर सरकारांतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी काही अटी तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत. तरच तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. मोफत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी कुठे अर्ज करायचा याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Annapurna Yojana
अन्नपूर्णा योजना काय ?
शिंदे सरकार मध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून एक महत्त्वाची योजना राबवण्यात आली. ती म्हणजे अन्नपूर्णा योजना ही योजना जुलै महिन्यामध्ये अर्थसंकल्पना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर देत येत आहे. हे गॅस सिलेंडर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. पण अनेक पुरुषांची नावे गॅस सिलेंडर असल्याने हजारो महिला मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेला आहेत.
ज्या महिलांच्या नावे गॅस सिलेंडर नाहीत त्यांना देखील या योजनेला मिळू शकणार आहे. यासाठी आता गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर महिलांच्या नावावर करावा लागणार आहे. त्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. याची प्रक्रिया देखील खूपच सोपी आहे.
इथे करा अर्ज
जर तुम्हालाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन सुद्धा कागदावर अर्ज करून गॅस कनेक्शन वरील नाव बदलू शकता. तुम्हाला फक्त एका साधा कागदावर अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचे नाव बदलायचे आहे. यानंतर महिलांना या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. सुरुवातीला लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे संपूर्ण पैसे द्यावे लागणार आहेत. त्यानंतर शासनाचे अनुदान तुमच्या खात्यावरती जमा केले जाईल.