शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पिक पाहणी बाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे, ती म्हणजे आता जर तुम्ही यापूर्वी पीक पाहणी केली नसेल ,तर राज्य शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे पीक पाहणी साठी आणखी महिनाभराची मुदत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. महत्वाचे कारण म्हणजे राज्यात यावर्षी खरीप हंगामातील पीक पूर्णपणे वाया गेल आहे. कुठे आतावृष्टी झाली, कुठे पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. शेतकरी अडचणी सापडलेला असताना पिक पाहणीच्या मदतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत होता. सप्टेंबर अखेर या पीक पाहण्याची कालावधी संपली म्हणून अनेक शेतकरी चिंतेत होते. पुन्हा आता महसूल विभागाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, पिक पाहण्याची मुदत आणखी एक महिना वाढवण्यात आली आहे. म्हणजे ऑक्टोबर महिनाभर सर्व उर्वरित शेतांची पाहणी करण्यासाठी सहाय्यकांना वेळ दिला जाणार आहे. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे स्पष्ट आदेश मंगळवारी कळविण्यात आले आहे.

खरंतर याआधीही अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना दिलासा म्हणून दोन आठवड्याची मुदत वाढ करण्यात आली होती. पण ती 30 सप्टेंबरला संपली. अजून हजारो शेतकऱ्यांची शेत पाणी शिवाय राहिली होती. गावापासून लांब असलेल्या शेतांची पाहणी अनेकदा शेतकरी उपलब्ध नसल्याने प्रलंबित राहते. त्यामुळे आता ऑक्टोबर मध्ये प्रत्येक गावातील उर्वरित शेतकरी जमिनीची प्रत्यक्ष पाहणे करून पूर्ण करावी असे आदेश महसूल विभागाने दिले आहे.

यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहाय्यक अधिकाऱ्यांनी केलेली प्रत्येक पाहणी 100% ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी तपासणी अनिवार्य आहे. कारण हाच अहवाल मंजूर होऊन नंतर 7/12 उताऱ्यावर पीक पाहण्याची नोंद चढते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा एकही हंगाम वाया जाऊ नये म्हणून यंदा सरकारने विशेष लक्ष घालण्याचे ठरवले आहे.

शेतकऱ्यांच्या खांद्यावर आधीच निसर्गाने संकटाचा डोंगर कोसळला. अशावेळी ती पाणी साठी मिळालेली ही अतिरिक्त मुदत म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासाच आहे. आता खरी चिंता आहे की, सर्व सहाय्यकारी वेळेत शेतात पोहोचवून शेतकऱ्यांचा अहवाल नीट तयार करतील का? प्रशासनाने दिलेली मुदत वाढ निश्चित शेतकऱ्यांच्या अशा पुन्हा उजळणारी ठरली आहे.

हे पण वाचा | E-pik grant | ई – पिक पाहणी केली तरच मिळणार अनुदान….

Leave a Comment

error: Content is protected !!