Agriculture News | राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी अचानक झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले होते. याच अतिवृष्टीग्रस्तांना एनडीआरएफ मध्ये पेक्षा दुप्पट मदत देण्याऐवजी तीन हेक्टर मर्यादित मदत मिळणार आहे.
राज्यामध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम ४८ अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधी ची स्थापना करण्यात आलेली होती. या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75 टक्के व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे अनुदान दिले जाते. राज्यपती प्रतिसाद निधी मधून दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, गारपीट,दरड कोसळणे, बर्फ वृष्टी, ढगफुटी, थंडीची लाट, हिमवर्षा यासारख्या नैसर्गिक आपत्तीत मध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुदान दिले जाते.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेले शेत पिकांचे नुकसान भरपाई देण्यासाठी 2109 कोटी 12 लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यासाठी शासन निर्णय मंजुरी देखील दिलेली आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे.
अचानक आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले होते. कापूस तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हेच नुकसान भरून काढण्यासाठी पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामामध्ये एका वेळेस पुरेल याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहित दराने मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत करण्यात येते.
गारपीट व नुकसान भरपाई च्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय 1 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिले जाणारे नुकसान भरपाई मदत दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे
5 thoughts on “26 जिल्ह्यातील नुकसान भरपाई जाहीर! नवीन जीआर पहा”