Agriculture News | शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. त्यावेळेस शेती करत असताना गारपीट अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. यामुळे शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये गेल्या महाविकास आघाडीने सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना सुरू केली होती.
ती म्हणजे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत गेल्या महा विकास आघाडीच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज माफ केली होती.
त्या वेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणि तत्कालीन वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या शेतकऱ्यांचे नियमित कर्ज परतफेड केली आहे. त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतला होता. मात्र गेल्या सरकारला या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार वरती निराशा निर्माण झाले आहे.
सध्याच्या सरकारला अंमलबजावणी करण्यासाठी तार्यावरची कसरत करावी लागत होती. मात्र या नव्या सरकारने म्हणजे शिंदे सरकारने गेल्या सरकारचा हा निर्णय अबाधित ठेवला. आणि नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.
तसेच पात्र शेतकऱ्यांना प्रथम वितरित करण्यात आले आहे. व शेतकऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये प्रथम अनुदानाचा पैसे मिळणार आहे. मात्र राज्यातील काही शेतकऱ्यांनी बांधवांना अजून देखील काही तांत्रिक अडचणीमुळे या योजनेचा लाभ मिळाला नाही. म्हणजे या योजनेचे 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे, त्यापासून बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत.
तसेच राज्य शासनाने या योजनेअंतर्गत प्रथम पर अनुदान देण्याच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांची तिसरी यादी लवकरच जाहीर होणार असून, लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी एकाच वर्षात दोनदा कर्ज परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना देखील सरकारच्या माध्यमातून अनुदान दिला जाणार आहे. यासाठी सरकारकडून योजनेचे नियमित काहीसा बदल केला जाणार आहे.
राज्य शासनाच्या मार्फत या संदर्भात आता माहिती मागवली आहे. खरे तर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्यातील बहुतांश शेतकरी मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करतात.
पण आता एकाच आर्थिक वर्षांमध्ये जर शेतकरी दोनदा कर्ज घेतले असेल अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देखील मिळणार आहे. प्रोत्सांपर अनुदानासाठी पात्र असूनही अशा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता. परंतु आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे.