Agricultural Compensation Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पाऊस व गारपीट वादळ वारा यांनी शेती पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्य सरकार मार्फत आता नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या आनंदाची बातमी देण्यात आली आहे. नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये आता वाढ करण्यात आले आहे. यामध्ये जर आपल्या देखील शेतीचे नुकसान झाले असेल तर नक्कीच आपल्या मदतीमध्ये वाढ होणार आहे. प्रति हेक्टरी मदतीमध्ये सरकारमार्फत 36 हजार रुपये दिले जाणार आहेत.
शेतकरी बांधवानो अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे राज्यातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पिकासाठी आत्तापर्यंत साधारण हेक्टरी 8500 रुपये मध्ये दिले जात होती परंतु यामध्ये आता राज्य सरकार मार्फत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे पण आता प्रत्येक हेक्टरी 13000 रुपये पर्यंत करण्यात आलेली आहे.
जिरायत पिकासाठी आतापर्यंत 2 हेक्टरी मर्यादित पर्यंत लाभ दिला जात होता परंतु यामध्ये देखील आता वाढ करण्यात आली आहे. 2 हेक्टरी एवजी आता 3 हेक्टरी मर्यादित पर्यंतच्या मदतीला वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच पिक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा:-एलपीजी सिलेंडर कंपन्यांनी दिली नववर्षाची भेट, 1 जानेवारी पासूनच एलपीजी सिलिंडरच्या दरात घट
Agricultural Compensation Update
तसेच अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे बागायती पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत बागायती पिकांना साधारणपणे हेक्टरी 17000 रुपये असा लाभ दिला जात होता परंतु आता यामध्ये वाढ करून प्रत्येक हेक्टरी शेतकऱ्यांना 27000 रुपये पर्यंत लाभ दिला जाणार आहे.
आतापर्यंत बागायती पीक उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी 2 हेक्टर च्या मराठी पर्यंत लाभ दिला जात होता परंतु आता यामध्ये देखील वाढ करून बागायती शेतकऱ्यांना पिकाच्या झालेल्या नुकसानासाठी 3 हेक्टर च्या मर्यादित लाभ दिला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक हेक्टरी आता 3 हेक्टर च्या मर्यादित लाभ दिला जाणार आहे.
त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे बहुवार्षिक पिकांचे म्हणजेच फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे आत्तापर्यंत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 22500 असा लाभ दिला जात होता परंतु यामध्ये आता वाढ करून प्रत्येक 36000 रुपये पर्यंत लाभ दिला जाणार आहे.
तसेच आतापर्यंत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर च्या मर्यादित लाभ दिला जात होता. परंतु यामध्ये देखील वाढ करून बहुवार्षिक पिकाच्या नुकसानासाठी आता 3 हेक्टर च्या मर्यादित पर्यंत लाभ दिला जाणार आहे. बहुवर्षी पिकांना अवकाळी पावसाचा गारपट्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे कारण हे पिके उत्पादक येण्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब घेतात.
हे पण वाचा:-शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 2 लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ, महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना