Friday

14-03-2025 Vol 19

आता घरी बसल्या जाणून घ्या तुमचा पॅन आधार कार्डशी लिंक आहे की नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card update : आधार कार्ड पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. यामुळे आता पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे, जर तुमचे पॅन कार्ड आदर्श लिंक नसेल तर तुम्हाला अनेक ठिकाणी समस्या येऊ शकतील, चला तर पाहू मग तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक आहे की नाही.

आजच्या या धावपळीच्या जगात तुम्ही काही महत्त्वपूर्ण कामे विसरून जातात जेणेकरून याची समस्या तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भासते. अशीच एक महत्त्वाचे काम म्हणजे, आपले डॉक्युमेंट योग्य ते काळात अपडेट करणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला अनेक ठिकाणी अडचण देखील येतील. आज आपण जाणून घेणार आहोत की आधार कार्ड शी पॅन कार्ड लिंक कसे करावे. व आपल्याला कसे समजेल की आपले आधार कार्ड पॅन कार्ड शी लिंक आहे की नाही.

आज आपण पाहत आहोत की आधार कार्ड पॅन कार्ड एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट बनले आहे. अशा परिस्थितीत तर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्याला सामोरे जावे लागणार आहे. भारत सरकारने काही महिन्यापूर्वी आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जेणेकरून आता पॅन कार्ड धारकांना त्यांच्या पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

तुम्हाला देशातील कुठल्याही ठिकाणी जर मालमत्ता खरेदी करायची असेल तर किंवा रिटर्न भरायचे असेल तर तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड सिलिंग असणे आवश्यक आहे. यानंतर जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड शी लिंक नसेल तर तुम्हाला मालमत्ता खरेदीदाराकडून प्राप्ती करण विभाग 20 टक्के टीडीएस वसूल करणार आहे.

सरकारने पॅन कार्ड ला आदर्श लिंक करण्यासाठी काही महिन्याचा कालावधी दिला होता परंतु आत्याती बऱ्याच जणांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंग केले नाही. सरकारने 30 जून ही अंतिम तारीख दिली होती. यानंतर तुम्हाला पॅन कार्ड आधार लिंक करायचे असेल तर आता तुम्हाला 1000रुपये भरावे लागणार आहे व तुमचे पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करून घ्यावे लागणार आहे.

जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे तपाशी असेल, तर तुम्हाला आयकर विभागाचे ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन हे तुम्ही जाणून घेऊ शकता. की तुमच्या आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे की नाही.

पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी खालील दिलेली माहिती योग्य ती वाचा:

सर्वप्रथम तुम्हाला खालील दिलेल्या आयकर विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावे लागणार आहे.
आयकर विभागाचे ऑफिशियल साइटवर जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टच करा .

http://incometax.gov.in/iec/foportal/

या लिंक वर टच केल्यानंतर तुम्ही आयकर विभागाचे ऑफिशियल पेजवर येतात त्यानंतर तुम्हाला तिथे तुमची माहिती भरायची आहे जसे की राज्य व नंतर लिंक आधार राज्य निवडा.

सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा पॅन आणि आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी प्रविष्ट करा.

आता तुम्हाला व्ह्यू लिंक आधार स्टेटस असे ऑप्शन दिसेल तिथे टच करा.

त्या ठिकाणी टच केल्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *