Agriculture News | नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर आपण भारत देशात सुद्धा अनेक शेतकऱ्यांकडे या उस्मानाबादी शेळीचे संगोपन केले जात असते. व महाराष्ट्र राज्य मध्ये मोठ्या प्रमाणावर शेळीपालन हा व्यवसाय देखील केला जात असतो. पण अशातच आता उस्मानाबादी ही शेळी आपल्या भारत देशामध्ये खूपच प्रसिद्ध का आहे? याबद्दलची माहिती दिलेली आहे तर, जाणून घ्या याबद्दलची संपूर्ण माहिती. Agriculture News
संपूर्ण शेळ्यामधील सर्वात जास्त प्राधान्य देणारी उस्मानाबादी शेळी ही महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच भागांमध्ये आढळत असते. पण प्रामुख्याने मराठवाड्यातील बालाघाट या डोंगराळ पट्ट्यामधील काटकपणा व चविष्ट मांसासाठी तयार झालेली ही संपूर्ण काळ्या रंगाची शेळी म्हणजेच उस्मानाबादी शेळी आहे.
मूळची ही शेळी उस्मानाबाद जिल्ह्यातली असल्यामुळे या शेळीला उस्मानाबादी शेळी असे नाव पडलेले आहे. ही शेळी आता महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर, लातूर, परभणी, सोलापूर अशा जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणावर आढळून येत असतात. उस्मानाबादी शेळी ही तिच्या उपयुक्ततेमुळे आंध्र प्रदेश व कर्नाटक आणि तसेच तेलंगाना या तीन राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येत असते.
पण मांस व दुग्धोत्पादन या दोन्हींसाठी योग्य असली तर या शेळीचे मांस हे उत्कृष्ट गुणवत्तेचे असल्यामुळे मुख्यत्व करून मांस उत्पादनासाठी या शेळीचा उपयोग हा केला जात असतो. आणि या शेळीच्या मांसासोबतच कातडीचा सुद्धा उपयोग हा बाजारामध्ये विकण्यासाठी केला जात असतो. आणि अशातच या उस्मानाबादी शेळीच्या मांसाला व कातडीला बाजारामध्ये चांगल्याच प्रकारे मागणी आहे.
उस्मानाबादी या शेळीची शारीरिक रचना,
या शाळा प्रामुख्याने अनेक रंगाच्या असल्या तरी बहुतेक प्रमाणावर शेळ्या ह्या काळ्या रंगाच्या असतात व त्यांच्यावर तपकिरी किंवा पांढरे ठिपके असतात. कान लोंबकळणारे, शिंगे ही मागे वळलेली असतात. या जातीच्या बोकडांना शिंगे सुद्धा असतात. आणि यामध्ये फक्त 50 टक्के शेळ्यांनाच शिंगे असतात, बाकीच्यांना शिंगे नसतात.
कपाळ बहिवक्र असून उंची 65 ते 70 सेंटीमीटर एवढी असते. आणि या जातीच्या शेळीचे वजन हे 32 किलोपर्यंत असते. तर बोकडाचे वजन सुमारे 34 किलो असते करडांचे जन्मता सरासरी वजन दोन ते अडीच किलो एवढे असते.
तर, या शेळीची प्रजनन माहिती.
जन्मापासूनच माझावर येण्याचे वय हे 7 ते 8 महिने असून, गाभण काळा 145-150 एवढ्या दिवसांचा असतो. प्रथम विन्याचे वय हे 13 ते 14 महिने असते. उस्मानाबादी शेळीमध्ये एक करडे जन्म देण्याचे प्रमाण 29 टक्के, जुळे पिल्ले 51% आणि टिळे 10 टक्के तर तीन पेक्षा जास्त प्रमाणावर 5 टक्के एवढे असते. सलग 2 वेतामधील अंतर 210 ते 245 दिवस असते.
या उस्मानाबादी शेळीचे उत्पादन
उस्मानाबादी ही शेळी दररोज सरासरी दुध उत्पादन 0.5 ते 1.5 लिटर एवढे असुन, दुध देण्याचा कालावधी हा 3 ते 5 महिन्यांचा असतो. मांसासाठी तयार झालेल्या शेळ्यांमधये शरीर हे वजनाच्या 45 ते 50 टक्के मांस मिळते