Agriculture News | येत्या काही दिवसांमध्ये राज्यसह देशभरामध्ये सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कार्यरत असणारे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे.
अशातच एक महत्त्वाची (Agriculture News) बातमी समोर येत आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हिताची घोषणा केली आहे. ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तासात अगदी स्वस्तात वीज देणार आहे. निवडणुका मुळे का होईना या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज राज्य सरकारची मोठी घोषणा
या संबंधित माहिती देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य सरकारने आत्तापर्यंत दीड लाख पंप दिलेले आहेत. तसेच ते म्हणाले आपण एकाच वर्षांमध्ये आठ लाख सोलार कुंभ मंजूर करून निधीचा पुरवठा केला आहे व मागील त्याला सोलर पंप देण्यात येणार आहे.
शेती विषयक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच सध्या पाच लाख सोलरची मागणी असून राज्य सरकारकडे आठ लाख सोलर सोलर पंप असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या रात्रीचे सकट आम्ही संपून टाकू असे वचन दिले होते. त्याचप्रमाणे ती आम्ही पूर्णही केले असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री फडणीस यांनी दिले.
तसेच या संबंधित बोलत असताना त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे आम्ही रात्रीचे संकट कमी केले आहे. शेतकऱ्यांना आता रात्री नाही तर दिवसा वीज मिळणार आहे.
त्यासाठी राज्य सरकारच्या अंतर्गत राज्यामध्ये 9000 मेगावात सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी 40,000 कोटी कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. व 25000 जणांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवल्या नंतर देकार पत्रांचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कृषी पंपासाठी दिवसा वीज मिळणार आहे.