Police Bharti: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात सतरा हजार पोलीस शिपायाची भरती करण्याची घोषणा काही महिन्यापूर्वी केली होती. परंतु भरती जाहीर होत नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची चिंता वाढली होती. शेवटी सरकारने भरती जाहीर केली आहे राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज प्रक्रिया आज पासून म्हणजेच पाच मार्चपासून सुरू होत आहे.
पोलीस भरती प्रक्रियेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला policerecruitment2024.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भरती संदर्भात सर्व माहिती देण्यात आली आहे. आवेदन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत ठेवण्यात आले आहे.
कोण कोणती पदे उपलब्ध आहे?
महाराष्ट्र राज्यात पोलीस पदासाठी एकूण 16190 जागांसाठी भरती प्रक्रिया घेतले जाणार आहे. यामध्ये पोलीस शिपाई, पोलिस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 ही आहे.
यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी 9373 जागा आहेत. पोलीस शिपाई वाहन चालक या पदासाठी 1576 जागा आहेत, पोलीस शिपाई एस आर पी एफ पदासाठी 341 जागा आहेत. कारागृह शिपाई या पदासाठी 1800 जागा आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यता प्राप्त महामंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष एवढे आहे. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून प्रवर्गांमधील रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यापैकी कमी गुण मिळालेले उमेदवार अपात्र ठरतील.
या भरती प्रक्रियेसाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 सेंटिमीटर पेक्षा कमी नसावी. त्याचबरोबर महिला उमेदवारासाठी 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. भरती प्रक्रियेसाठी पुरुषांची छाती न फुक्ता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.Police Bharti
पोलीस भरती प्रक्रियेसाठी शारीरिक चाचणीमध्ये 1600m मीटर 30 गुणांसाठी आहे. तर महिलेसाठी 800 मीटर 30 गुणांसाठी आहे. तसेच पुरुषांसाठी व महिलांसाठी 100 मीटर 10 गुणांसाठी आहे. त्याचबरोबर गोळा फेक 10 गुणांसाठी आहे. एकूण शारीरिक चाचणी 50 गुणांची घेतली जाते.
हे पण वाचा:- सोयाबीन बाजार भावात मोठा बदल..! पहा आजचे राज्यातील सोयाबीन बाजार भाव