Ration Card New Updates: नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाने 2023 ते 2018 पाच वर्षासाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता दिली आहे. या अंतर्गत राज्यातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडी मोफत देण्यात येणार आहे.
राज्यातील अत्यावश्यक शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या सणा दिवशी या साडीचे वाटप करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 27 हजार सात लाभार्थ्यांना या साड्याचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे.
किती रुपयाची मिळणार साडी?
रेशन कार्डधारकांना साडेच्या वाटपासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाची मॉडेल संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. ती एक साडी सरकार महामंडळाकडून 355 रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्याचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.
कोणत्या सणाला मिळणार साडी?
महाराष्ट्र शासनाने चैत्र पाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती आणि दिवाळी सणानिमित्त रेशन दुकानातून आनंदाच्या शिधा देण्याची मोहीम हाती घेतली होती. आता राज्य शासनाकडून राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार राज्य शासनाने निश्चित केलेल्या सणाच्या वेळी दरवर्षी एक साडी शिधापत्रिका धारकांना दिली जाणार आहे. त्यानुसार राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. राज्यातील 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कशी होणार वाटप? | Ration Card New Updates
जे शिधापत्रिका धारक अंत्योदय योजनेत समाविष्ट आहेत. त्यांना साडीचे पुरवठा विभागाकडून वितरण करण्यात येणार आहे. या योजनेतील धान्याचे वाटप हे ई-पास मशीनद्वारे करण्यात येणार. त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता निर्माण होते. त्याचा विचार करून शाळेचेही वाटप पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी त्याचे वाटपही आता ई-पास मशीन द्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हे पण वाचा:- गुड न्यूज कापसाच्या बाजारभावात 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटलची वाढ, पहा कुठे मिळत आहे सर्वोच्च भाव?
अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
अस्वीकरण:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.
धन्यवाद..!
2 thoughts on “या सत्तावीस हजार रेशनकार्ड धारक कुटुंबासाठी गुड न्यूज, पहा काय मिळणार नवीन फायदे?”