Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बऱ्याच दिवसापासून दबावत असलेले (Cotton Rate) बाजार भाव वाढवण्याची शक्यता आता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे महाराष्ट्र मध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कपाशी पिक महाराष्ट्र मधले नगदी पीक आहे.
याचे उत्पादन राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मधील बहुतांश शेतकरी घेत आहे. या पिकावरती या शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. गेल्या दीड ते दोन वर्षापासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरती संकटाचे सावट दिसून येत आहे.
शेती विषयक आणि हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
कधी सरासरी पेक्षा कमी , तर कधी गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकऱ्यांना शेती करावी लगते. त्यामध्ये शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
बऱ्याच दिवसापासून कापसाचे बाजार भाव दाखवत असल्याने शेतकऱ्यांना या पिकाची शेती परवडत नाही. तसेच या चालू हंगामामध्ये देखील आतापर्यंत कापसाला योग्य असा भाव मिळाला नाही. आता मात्र हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना आणि शेतकऱ्यांकडे बहुतांश माल विक्री झाल्यानंतर बाजारामध्ये थोडेसे भाव वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कापसाचे बाजार भाव गेल्या दोन-तीन आठवड्यात मध्ये दहा टक्क्यांनी वाढले आहेत. अशी माहिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम म्हणून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. एवढेच नाही तर बाजार अभ्यासकांनी बाजार दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता देखील यावेळी वर्तवली आहे.
कापसाला मिळतोय एवढा दर (Cotton Rate )
मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशांतर्गत कापसाची सरासरी 7350 ते 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. विशेष म्हणजे खेडा खरेदीमध्ये देखील सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिकचा दर मिळत आहे.
यंदा हंगामाच्या सुरुवातीला सरकारने जाहीर केलेला हमीभावापेक्षा देखील कमी दरामध्ये शेतकऱ्यांना कापूस विक्री करावा लागला होता. परंतु काही दिवसांपासून राज्यातील बाजारभावामध्ये वाढ झाली आहे. काही बाजार मध्ये कमाल आठ हजार रुपये इतका दर मिळत आहे. मात्र हे बाजार भाव खूपच मोजके बाजार समितीमध्ये आणि खूपच कमी मालाला मिळाले आहेत.
याचा फायदा फक्त किंचित शेतकऱ्यांना होत असलेले दिसून येत आहे. जिनिंगचा कापूस करिता भावा 7600 ते 8200 दरम्यान नमूद करण्यात आला आहे. अभ्यासाकनी सांगितल्याप्रमाणे गेल्या महिन्यात रुईला उठावा होता आता मात्र सरकीला उठावा मिळत आहे.
सध्या तज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये या बाजारभावता आणखी 5% ने वाढ होईल असे देखील नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असेल त्यांनी आगामी काळात चांगला दर मिळू शकणार आहे. तथापि शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करावी अशी देखील मत व्यक्त केली आहे.
1 thought on “Cotton Rate | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कापसाचे बाजार भाव आणखी वाढणार, तज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती वाचा सविस्तर”