Farmer compensation | शेती करत असताना शेतकऱ्यांना मोठे संकटांचा सामना करावा लागतो. कधी गारपीट कधी अवकाळी पाऊस तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. परंतु यंदा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. राज्यात मागील 2023 या हंगामामध्ये सरासरीपक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तसेच काही भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.
परंतु काही दिवसांपर्वी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सहा कोटी 47 लाख 41 हजार दिले आहे. याबाबत राज्य शासनाने जीआर जाहीर केला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान
मागील वर्षा अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे उभे पीक मातीमोल केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यासाठी शेतकरी वर्ग मधून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. जिल्ह्यामध्ये 7899 शेतकऱ्यांना 7 हजार 549.55 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांची नुकसान झालेले आहे.
यासाठी शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आलेली होती. त्यानुसार आपत्ती निवारण विभागाच्या विभागीय आयुक्तांकडून आर्थिक मदतीची निधी मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून आता आपत्ती वितरण निवारण निधी मधून शेतकऱ्यांना 6 कोटी 47 लाख 41 हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
3 हेक्टरपर्यंत मिळणार शेतकऱ्यांना मदत
शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीसाठीची मदत प्रामुख्याने तीन हेक्टर पर्यंत मिळणार आहे. तसेच राज्य शासनाच्या घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती करिता अवस्थेच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65 मिमी पेक्षा जास्त नोंद झाल्या असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावांमध्ये 33% पेक्षा जास्त शतकांच्या नुकसान झाले असल्यास ही मदत दिली जाणार आहे. मात्र ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही. अशी राज्य सरकारच्या जीआर मध्ये नमूद देखील करण्यात आलेले आहे. व लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे.