Soybean Rate Today | यंदा हंगामामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने सोयाबीन कापूस तूर या खरीप हंगामा मधील पिकांचे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. त्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या हातात आलेला घास माती मोल झाला.
एकीकडे खरीप हंगामा मधील कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा सोयाबीनचे भाव बसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
सोयाबीनच्या दरामध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. सध्याच्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये एक हजार ते बाराशे रुपयाची घसरण झालेली आहे. सध्या बाजारामध्ये सोयाबीनला चार हजार 100 ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे.
यंदा फारसा पाऊस न झाल्यामुळे शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी त्यांचा माल घरामध्ये साठवून ठेवत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.
सुरुवातीला सोयाबीनला चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये पर्यंत भाव मिळाला होता. मागच्या हंगामामध्ये सोयाबीनला नऊ हजार ते बारा हजार रुपये इतका दर मिळाला होता.
शेतकऱ्यांच्या मध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाला आणखी भाव मिळेल या आशेवर माल साठवून ठेवलेला आहे. मात्र तज्ञांचे मते कापूस आणि सोयाबीन दरामध्ये कुठल्याही प्रकारची तेजी येणार नसल्याचे म्हटले गेले आहे.
सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल 1000 ते 1200 रुपये पर्यंत घसरण झाल्याची दिसून आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आणखी चिंता वाढली आहे. सध्याच्या घडीला बाजारामध्ये सोयाबीनला चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये पर्यंत भाव मिळत आहे.