Agriculture News | शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन अनेक अशा कल्याणकारी योजना राबवतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी भर देतात. अशीच एक योजना म्हणजे पी एम किसान योजना होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सहा हजार रुपयांची वर्षाकाठी मदत दिली जाते.
ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते ही मदत शेतकऱ्यांना दोन हजार एका हप्त्याप्रमाणे दिले जातात.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता या योजनेचा सोहळा हप्ता लवकरच जमा होणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये वायरल होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना या योजनेची आतुरता लागली आहे.
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. हप्ता वितरित करून जवळपास चार महिने उलटले आहेत. आता शेतकऱ्यांना सोळाव्या हप्त्याची आशा लागली आहे.
खरे तर राज्य शासन देखील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या या योजनेच्या धर्तीवर अशीच एक योजना राबवत आहे. ती योजना म्हणजे नमो शेतकरी योजना ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते.
दरम्यान योजनेचे देखील वृत्त प्रसार माध्यमाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता. व आता दुसरा हप्ता येत्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याचे वृत्त वायरल होत आहे.
परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा दावा फक्त मीडिया रिपोर्टनुसार केला जात आहे. तसेच पीएम किसान योजनेच्या सोळाव्या त्याबाबत देखील मीडिया रिपोर्ट मध्ये मोठ्या दावा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुढचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता प्रसारमाध्यमांमध्ये वर्तवली जात आहे.
याच मीडिया रिपोर्टच्या दाव्यानुसार, पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असे वाटत आहे.
परंतु सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता बाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार हा आपला दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे की, शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरंच दोन्ही हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार का.