Cotton Market | कापुस बाजारातली सध्याची स्थिती पाहता कापूस बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.कापूस हे महाराष्ट्र मधले नगदी पीक आहे. राज्यामध्ये या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. यंदाचा हंगाम सुरू झाले असताना बाजारभाव मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. कष्टाने पिकवलेल्या कापूस पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला कापसाला 7300 ते 7500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर आता कापसाच्या बाजारभाव मध्ये मोठी घसरन पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे, शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत. शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. शेतकऱ्यांच्या मते कापूस पिकाला 9 हजार ते 10 हजार अशी अपेक्षा आहे.
सध्या बाजाराची स्थिती पाहता कापसाचे भाव घसरलेले असताना शेतकऱ्यांना किमान कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढी भावाची अपेक्षा आहे.
तज्ञांची मते काय ?
सध्याची परिस्थिती पाहता येता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. कापसाचे दर वाढतील त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा माल घरांमध्ये साठवून ठेवला आहे. खरंच पुढील काळात कापसाचे बाजार भाव वाढतील का ? कापसाचे बाजार भाव आठ हजारावर जातील का ? जानेवारी महिन्यानंतर कापसाचे बाजार भाव कसे राहतील. या संदर्भात तज्ञांनी काही माहिती दिली आहे ती माहिती आपण सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
बाजारामध्ये सगळी स्थिती पाहतात. शेतकऱ्यांनी भाव न वाढणार अशा चिंतेने, त्यांचा कापूस विकण्यास सुरुवात केली आहे. परंतु तज्ञांच्या मते शेतकऱ्यांनी चांगला कापूस 7500 रुपये क्विंटल च्या कमी विकू नये असे मत व्यक्त केले आहे. व या मुलाखती त्यांनी बोलत असताना असे सांगितले की बाजारातील तज्ञांनी दिलेल्या माहितीवर जास्त काळ अवलंबून राहू नये. कापसाचे भाव वाढत असल्यास तात्काळ शेतमालाची विक्री करावी.