Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील काही बाजार समितीमध्ये कापसाला समाधानकारक असा दर मिळत आहे. मानवत सेलू आणि परभणी यांच्यासारख्या राज्यातील प्रमुख व्यापारी केंद्रामध्ये कापूस बाजारात अवकाळी पावसा नंतर कापसाच्या भावामध्ये मोठी घसरण झाली.
राज्य मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कापसाला किमान पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि कमल सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. व तसेच न भिजलेल्या कापसाला किमान 7055 रुपये तसेच कमाल 7230 रुपये आणि साधारण 7130 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यातील बळीराजावर आलेले अवकाळी पावसासारखा संकटाने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले आहे. सर्वात जास्त म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे. अवकाळी पावसामुळे कापूस पिकावर बोंड आळी आणि गोंडे फुटून फायबर भिजल्याने कापसाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. गुणवत्तेवर आणि मुख्य लांबीवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे किमती घसरलेल्या दिसून येत आहेत. सध्या बाजारामध्ये भिजलेल्या कापसाची आवक सुरू आहे.
बाजारामध्ये भिजलेल्या कापसाचे व न भिजलेल्या कापसाचे वर्गीकरण करत आहेत. शुक्रवारी सेलू येथे नुकसान झालेल्या कापसाला सात हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल सरासरी 7,250 रुपये तर भिजलेल्या कापसाला पाच हजार आठशे ते सहा हजार 895 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे.
गुरुवारी झालेल्या लिलावामध्ये भिजलेल्या कापसाला 5,800 ते 7000 रुपये प्रति क्विंटल व तसेच न भिजलेल्या कापसाला 7050 ते 7400 पाच रुपये इतका दर मिळाला आहे. मानवत बाजार समितीमध्ये शुक्रवारी नुकसान झालेल्या कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये दर मिळाला आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कापसाला कमी दर मिळत आहे. व त्या आधीच्या मालाला 7100 ते 7,220 रुपये प्रतिक्विंटल तसेच साधारण 7175 रुपये भाव मिळाला आहे. शुक्रवारी झालेल्या आवक मध्ये 1हजार 450 क्विंटल इतकी आवक झाली होती. त्यामध्ये प्रतिक्विंटल कापसाला सात हजार शंभर ते सात हजार 130 रुपये आणि साधारण 7110 रुपये दर मिळाला होता.
नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या झालेल्या पावसामुळे कापूस पिकाला कमी दर मिळत आहे. शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.
भारतीय कॉटन असोसिएशन आणि राज्य सरकारने नुकसानीचे मूल्यांकन करून राज्यातील शेतकऱ्यांना योग्य किंमत देण्याची गरज आहे. बाजारभाव मध्ये आणखी घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघामार्फत कापूस खरेदी करण्याची सुरुवात केली आहे.