Cotton Market Price : आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि या दिवशी तरी शेतकऱ्यांना गुड न्यूज पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु पाहिले गेले तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पहिल्याच दिवशी कापसाच्या दराने नीच्चांकी गाठली आहे.
मागच्या वर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित असा पाऊस झाला नाही जवळपास सर्वच पिकांमध्ये घट झाली आहे. तसेच कापूस पिकांमध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. शेतकऱ्यांनी कसेबसे आहे त्या पाण्यावरती शेत पिक फुलवली. परंतु शेतकरी अपेक्षित असा भावना मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये महाराज असल्याचे दिसून येत आहे.
शेती हवामान आणि बाजार भाव विशेष बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्र सरकारच्या कापूस गाठींच्या आयातिच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असून माती मोलदाराने शेतमाल त्यांना विकावा लागत आहे. लांब धाग्याच्या कापसाला सात हजार वीस रुपये हमीभाव मिळालेला असतानाही पणन मंडळाच्या आजच्या उपलब्ध माहितीनुसार केवळ पाच हजार आठशे पन्नास रुपये सरासरी दर मिळालेला आहे.
दरम्यान आज लोकल मध्यम स्टेपल, लांब स्टेपल, एच केएच-४- मध्यम स्टेपल, एच -४- मध्यम स्टेपल या कापसाचे आवक बाजारात झाली होती. त्यामध्ये पाच हजार 850 रुपये सरासरी दर हा संगमनेर बाजार समितीला मिळाला. तर पुलगाव बाजार समितीमध्ये ६९५० रुपये प्रति क्विंटल एवढा आजचा दिवसातील सर्वात जास्त सरासरी दर मिळाला.
विशेष म्हणजे आज एकही बाजार समितीमध्ये हमीभाव एवढा दर मिळाला नाही. त्यामुळे नव्या वर्षाचा पहिला दिवस शेतकऱ्यांसाठी नाराजी चा किंवा निरासाजनक ठरला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील आणि या हंगामातील कापूस साठून ठेवला आहे. पण दर नसल्याने तो बाजारात काढला जात नाही. येणाऱ्या काळात कापसाला चांगला दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांना लागले आहे.
आता याच्याकडे पाहने गरजेचे आहे की शेतकऱ्यांना कधी अपेक्षित असा दर मिळतो. कारण यावर्षी अपेक्षित असा पाऊस न झाल्यामुळे काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. जर शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर न मिळाला तर शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.