Soybean Market Price: यंदाच्या वर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना फारच निराश्य दाखवलें आहे. कारण या सोयाबीनचा भाव दोनशे रुपयांनी उतरल्यांने शेतकरी खचून गेला आहे. यंदा रब्बीची पेरणी होऊन पिके काढणीला आली. गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये 200 ते 300 रुपयांनी क्विंटल प्रमाणे दरात घट झाली. काही सोयाबीन विक्रेत्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला नेलेले नाही. अशा शेतकऱ्यांच्या तोंडावर निराशा दिसून येत आहे. सध्या लातूरच्या कृषी मार्केट यार्ड मध्ये 13,893 सोयाबीनची आवक होती. तर सर्वसाधारण दर 4,850 निघाला यामुळे यावर्षी सोयाबीनचा भाव वाढणार का नाही ? असा प्रश्न हा शेतकऱ्यांना पडलेला आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे.ऊस आणि सोयाबीन ही लातूर मधील प्रसिद्ध पिके प्रमुख आहेत. पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झाला, तर ऊस या पिकाकडे शेतकरी वळतात. आणि जर पावसाच्या जीवावर पिक काढायचे असतील, तर शेतकरी सोयाबीन या पिकाकडे वळतात.
ऊस कसाबसा असला तरी बऱ्यापैकी उत्पन्न होते मात्र दर मिळत नाही. प्रत्येक क्विंटल पाच हजार 100 च्या वर सोयाबीनचा दर गेलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा दर वाढेल. व नफा जास्त होईल, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा केला होता. व दर न वाढल्याने सोयाबीनचा साठा तरी कव्हर ठेवावा.
सर्वाधिक तुरीला दर 9 हजार रुपये, क्विंटल…
लातूर जिल्ह्याच्या बाजारामध्ये तुरीला सर्वाधिक जास्त दर मिळालेला आहे हा दर 9000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळाला. आणि त्याच प्रमाणे त्याच्या पाठोपाठ उडदाला देखील आठ हजार क्विंटल प्रमाणे भाव मिळालेला आहे.
पण शेतकऱ्यांनी या मालाची विक्री या आधीच केलेली आहे. आणि ही विक्री केल्यामुळे, शेतकऱ्यांना त्या दराचा काही फायदा होत नाही, अशी परिस्थिती आहे. हरभरा या पिकाला ही थोडा जरा दर आहे. पाच हजार, पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हरभरा लातूर जिल्ह्याच्या बाजारामध्ये विकला जातो.