Maharashtra Weather Update:- महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून जोरदार पाऊस झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट झालेली आहे. गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील आठ दिवसात पावसाने विश्रांती घेतलेली आहे पण बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशाच्या दक्षिणेकडे राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात देखील झाली आहे.
मागील काही दिवसात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. पण अजून देखील पावसाने हजेरी लावली नाही. पण येणाऱ्या काही दिवसात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी कडकडीत थंडी देखील जाणवत आहे. महाराष्ट्र राज्यातील तापमानात घट देखील होत आहे.
हे पण वाचा :-सावधान ! ‘या’ तारखेला महाराष्ट्र पुन्हा जोरदार पाऊस आला सुरुवात होणार, पंजाबरावांचा हवामान अंदाज
Maharashtra Weather Update
भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान अंदाजाने दर्शवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात काही भागात जोरदार अवकाळी पाऊस होणार आहे. राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागात हलका ते माध्यम पाऊस पडणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
अशा वातावरणामध्ये शेतकऱ्याने व सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्याने आपल्या पिकाची व तसेच जनावराची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून अवकाळी पावसाने त्यांना काही नुकसान होणार नाही.
महाराष्ट्र राज्य सोबतच देशातील काही राज्यांमध्ये आगामी काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे देशातील पश्चिम बंगाल आणि सिक्कीम राज्यात काही ठिकाणी 12 डिसेंबर पासून गारपिट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
देशातील जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवसात राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे असे सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्यात मात्र काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी थंडीचा जोर राहणार आहे. या भागात थंडीचा जोर वाढेल तेथील शेतकऱ्याच्या पिकांना नव्हती फुटेल व पिकाची चांगली जोरदार वाढ देखील होईल.
हे पण वाचा:- सोयाबीनच्या भावात चारशे रुपयांची घसरण! बाजारभाव पडण्याचे नेमके कारण काय ? वाचा सविस्तर
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.