Solar Panel : शेतकऱ्यांना जमिनीला पाणी देण्यासाठी सारखी वीज राहत नाही. या कारणाने शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने वीज दिली जाते. शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात महावितरणाने सौरप्रकल्प बसवले. यासाठी दहा हजार एकर जमीन तयार केलेली आहे. या सौर प्रकल्पामुळे आता शेतकऱ्यांसाठी वीज ही दिवसा देण्यात येणार आहे.
कृषीप्रधान देशात अजूनही शेतकऱ्यांना दिवसभरात वीज मिळलेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसभर वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर प्रकल्पाची ऐतिहासिक योजना राज्य सरकारने जारी केली आहे यासाठी गायरान व शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनी भाड्याने घेऊन या प्रकल्पाची उभारणी केली, जात आहे. एका ठिकाणी कमीत कमी चार एकर जमीन आवश्यक असून त्या जागेवर एक मेगावाॅट सौर प्रकल्प उभारला जाईल.
व दहा एकर जमिनीवर दोन ते पाच मेगावाॅट पर्यंत प्रकल्प बसवला जाऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीला दोन हजार 69 एकर गायरान जमिनीवर सौर प्रकल्पाचे निर्मिती होणार आहे. त्यातूनच अंदाजे 50000 हून अधिक शेतकऱ्यांना लाईट दिवसा दिली जाईल. असा शब्द महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांसाठी योजनेतून सर्व प्रकल्प बसवला जाईल.
सबस्टेशनचे सक्षमीकरण युद्ध पातळीवर
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सध्या गायरान जमिनीवर सौर प्रकल्प बसवला जाणार आहे. तत्पूर्वी महावितरण च्या तारांमधून केवळ वीज ग्राहकांसाठी दिले जात होती. वीज निर्मिती प्रकल्पातून तारांद्वारे 33 केव्ही 20 यायचे आणि अकरा केव्ही जात होती. आता पहिल्यांदाच त्या तारांमधून सबस्टेशनवर सौर प्रकल्पातून तयार होणारी वीज आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आधीच्या यंत्रणेत काही बदल करून वीज निर्मिती शेतकऱ्यांसाठी पुरवली जाईल. यंत्रणेचे सक्षमीकरण युद्ध पातळीवर केले जात आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वीज दिवसा देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांचे भाडे एकरी साठी
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत गायरान व खाजगी जमिनी घेऊन त्यावर सौर प्रकल्पाचे निर्मिती केली जातं आहे. खाजगी शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी दिल्यास त्यांना वार्षिक व एकरी 50 हजार रुपये भाडे भेटणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यास त्याची जमीन ही
पंधरा वर्षासाठी सरकारला भाड्याने द्यावें लागेल सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील आठ हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी त्याला तयारी दाखवली असून, असे अर्ज त्यांनी महावितरण कडे केले आहेत. आता सुरुवातीला गरजेच्या ठिकाणच्या जमिनी ह्या भाड्याने घेतले जाणार आहेत.
सोलापूर जिल्ह्याची स्थिती
एकूण सब स्टेशन
267
सौर प्रकल्प बसवणारे सब स्टेशन
239
प्रकल्पासाठी गायरान जमिनी
2069 एकर
शंभर टक्के गायरान जमीन
29 सप्टेशन
30 ते 80 टक्के गायरान जमीन
50 सब स्टेशन