Eknath Shinde News : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे उभ पीक आडवा झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे चांगले रडवल आहे. मात्र, याच दरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलेला आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके माती मोल झाली आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच रडवले आहे. याच दरम्यान आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले ठिकाणी त्वरित पंचमी करा असे, आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर राज्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करा. असे, आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी ग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
काल झालेल्या अवकाळी पावसाचा नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, जालना , परभणी, नांदेड, बुलढाणा या सहित इतर जिल्ह्यांनाही तडका बसला आहे. काही ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांची जनावरही दगावले आहेत. तसेच शेतकऱ्यांची पिकेही जमीन दोस्त झालेली आहेत.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्री मेगागर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी केंद्रीय माहिती संवाद आणि तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली.
अवकाळी पावसामुळे शेतीतील कापूस, तूर, गहू, हरभरा आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी उभारलेले शेडनेट पडल्याचे घटना घडली आहेत. तर अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतजमीन हि रकडून गेली आहे.