Drought declared : राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे मराठवाडा सह जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 42 तालुके अवषरनग्रस्त ठरविण्यात आलेले आहेत यापैकी मोठ्या प्रमाणावर बसलेले 40 तालुके अंतिम करण्यात आलेले असून या तालुक्यात येत्या दोन दिवसांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. .
यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा सुमारे 12% पाऊस कमी झाल्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे सप्टेंबरमध्ये केलेल्या शास्त्रीय निकषांच्या कसोटीवर 42 तालुके पात्र ठरले आहेत तत्पूर्वी 194 तालुक्यांमध्ये पावसाची अभावी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती त्यानुसार या तालुक्यांमध्ये दुसऱ्या ट्रिगर नुसार माहिती भरण्यात आलेली आहे त्यानुसार केवळ 42 तालुके पात्र ठरले आहेत.
जिल्हानिहाय तालुक्यांची यादी
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर, सोयगाव, जालना: जालना, भोकरदन, वंदनापूर, अंबड, मंठा, बीड: वडवणी धारूर, अंबाजोगाई, लातूर: रेणापूर, धाराशिव: वाशी, धाराशिव, लोहारा, नंदुरबार: नंदुरबार, धुळे, शिंदखेडा जळगाव, चाळीसगाव, बुलढाणा, बुलढाणा, लोणार, नाशिक, मालेगाव, सिन्नर, येवला, पुणे, पौंड, दौंड, पुरंदर, सासवड, वेल्हा, बारामती, इंदापूर, सोलापूर, करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस, सांगोला, सातारा, वाई,खंडाळा कोल्हापूर, हातकणंगले, गडहिग्लज, सांगली, शिराळा,कडेगाव,खानापूर, विटा,मिरज