IRCTC News : महाराष्ट्र मध्ये सध्या सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. गणेशोत्सवासाठी अनेक जणगावी जाण्यासाठी निघाले आहेत. गावी जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच अनेक प्रवाशांचे एसटीचे तिकीट बुक करण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. यात प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता तुम्ही IRCTC वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने एसटीचे तिकीट बुक करू शकतात.
Railway And Bus Ticket Booking
अनेक प्रवासी एसटीने प्रवास करतात काही अंतराच्या प्रवासासाठी लोक एसटीला प्रधान्य देत असतात. परंतु त्यांना तिकीट बुकिंग साठी खूप त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून मोठा दिलासा गायक निर्णय घेतलेला आहे. आता एसटीच्या टिकटांसाठी लांबलतच रांगांमध्ये उभे राहण्याची गरज नाही तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून IRCTC चे वेबसाईटवरून तिकीट बुक करू शकता.
नागरिकांना एसटीचे तिकीट काढण्यासाठी जवळपासच्या एसटी स्टँडवर जाऊन तिकीट काढावे लागत असते. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होतो त्यात तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही तिकीट बुक करू शकतात.
IRCTC आणि एस टी महामंडळामध्ये तिकीट बुकिंग साठी एक करार झाला आहे. प्रवाशांना एकाच वेबसाईटवरून रेल्वे आणि एसटीचे तिकीट आता बुक करता येणार आहेत. रेल्वेने प्रवास करणारे 75 टक्के लोक IRCTC अधिकृत वेबसाईटवरून तिकीट बुक करतात ही सुविधा एसटी च्या प्रवासासाठी आता उपलब्ध झालेली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऑगस्ट महिन्यात IRCTC आणि एस टी महामंडळामध्ये करार झाला आहे. यामुळे रेल्वे एसटी चे सर्व टिकीट आता बुक करणे सोपे होणार आहेत.
बस टिकीट बूक करण्यासाठीं इथे क्लिक करा
कसे कराल ? एसटीचे तिकीट बुक
तिकीट बुक करण्यासाठी सर्व माहिती IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करू शकता.