महाराष्ट्र मध्ये अजून एक होणार मोठा महामार्ग; या जिल्ह्यांमधून असणार मार्ग वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Highway News : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पांची गुंज ऐकायला भेटत आहे. समृद्धी महामार्गासारख्या भव्य आणि वेगवान प्रकल्पानंतर आता नागपूर पासून थेट गोव्यापर्यंत जाणारा शक्तिपीठ महामार्ग उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सोलापूर पासून सिंधुदुर्ग, धाराशिव पासून यवतमाळ आणि नांदेड पासून कोल्हापूर अशा तब्बल 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग महाराष्ट्राच्या 371 गावांमधील 8615 हेक्टर जमिनीवरून जाणार आहे. Maharashtra Highway News

कुठून कसा असणार नवा महामार्ग?

या महामार्गाची सुरुवात होणार आहे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून, आणि तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रा देवी पर्यंत जाणार आहे. एकूण 802 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग प्रदेश नियंत्रित (Access Controlled) असणारा असून, यामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि अखंड होणार आहे.

कोणत्या जिल्ह्यातील किती जमिनीचा होणार भूसंपादन?

सरकारी आकडेवारीनुसार या महामार्गासाठी खालील प्रमाणे जमिनीचे भूसंपादन होणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1689 हेक्टर, यवतमाळ 1423 हेक्टर, कोल्हापूर 1262 हेक्टर, परभणी 742 हेक्टर, सांगली 556 हेक्टर, धाराशिव 461 हेक्टर, हिंगोली 430 हेक्टर, वर्धा 435 हेक्टर, लातूर 414 हेक्टर, बीड 411 हेक्टर, नांदेड 387 हेक्टर, सिंधुदुर्ग 399 हेक्टर हे भूसंपादन 39 तालुक्यांमधून व 371 गावांमधून पार पाडला जाणार आहे.

हा महामार्ग केवळ वाहनांसाठी असेल, तर तो राज्याच्या भौगोलिक, संस्कृतीक आणि आर्थिक विकासाला प्रमुख दुवा ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर, सांगली तर मराठवाड्यातील धाराशिव, परभणी, बीड, लातूर, हिंगोली आणि विदर्भातील वर्धा, यवतमाळ, कोकणातील सिंधुदुर्ग हे सर्व जिल्हा आता एकमेकांशी सरळ रस्त्याने जोडले जाणार आहेत, ज्यामुळे व्यवसाय, कृषी पर्यटन आणि रोजगारच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे, तो राज्यातील प्रमुख शक्तीपीठांची थेट जोडला जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची भवानी माता, आणि माहूरची देवी रेणुका यासारख्या महत्त्वाच्या देवस्थानांना एकत्र जोडणारा हा महामार्ग हजारो भक्तांसाठी सोयीचा ठरणार आहे. धार्मिक स्थळांना जोडल्यामुळे परिसरातील व्यवसाय, हस्तकला, स्थानिक उत्पादन विक्री, आणि वाहतूक व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार आहे.

या प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केली जाणार आहे. एकदा भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली की, तीन वर्षाच्या आत हा महामार्ग तयार केला जाईल असा अंदाज आहे.

परंतु या महामार्गासाठी भूसंपादन सुरू होत असतानाच अनेक भागास स्थानिक शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. जमीन गेल्यानंतर योग्य मोबदला आणि पुनर्वसन हे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. सरकारी योग्य मोबदला सोबत शेतीपूरक पर्याय उपलब्ध करून देण्याचा आश्वासन दिला आहे. परंतु शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दाखवला आहे.

समृद्ध महामार्गाने जसं राज्याला नवी संधीचा दार उघडलं, तसा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विभागाने धावणाऱ्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. ग्रामीण भागांचा बाजारपेठाशी संपर्क वाढेल. रोजगार निर्मिती होईल, पर्यटन कृषी आणि उद्योगाला गती मिळेल.

हे पण वाचा | गुड न्यूज! महाराष्ट्राला मिळणार सात वंदे भारत एक्सप्रेस, पहा कोणते आहेत मार्ग

Leave a Comment

error: Content is protected !!