Success story : शेतकऱ्याचा नादच खुळा! फक्त आठ एकरातून कमवला 50 लाखांचा नफा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success story : शेती म्हटलं की पहिल डोळ्यासमोर येते ते काबाडकष्ट करणाऱ्या, रानात राबणाऱ्या शेतकऱ्याच चित्र. आणि शेती म्हटलं की जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असणाऱ्या बळीराजाची. परंतु या शेतकऱ्यांना सध्या शेती करणे हे अवघड झालेल आहे. बाजारात योग्य भाव मिळत नाही. आणि भाव मिळाला तर निसर्ग साथ देत नाही. कधी दुष्काळ, कधी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी यासारख्या संकटांना तोंड देत शेतकरी शेती करत असतो. आपण नेहमी म्हणतो शेअर मार्केट म्हणजे एक जोखीम आहे. यामध्ये पैसे टाकले कधी कमी होतील कधी वाढतील सांगता येत नाही. तसंच शेतीचं बी झालेला आहे, शेतकरी दरवर्षी खरीप हंगामामध्ये त्यांची मेहनत पैसे आणि डोळ्यासमोर असलेले स्वप्न सगळं या काळ्या आईच्या पोटामध्ये टाकतो. पुढे काय होईल हे माहीत नसतं, परंतु मेहनत करायचं सोडत नाही. शेती म्हणजे हे एक प्रकारचं शेअर मार्केटचा आहे नफा कमी पण जोखीम जास्त. परंतु या सर्व गोष्टींना मात देत एकाच शेतकऱ्यांनी त्याची यशोगाथा लिहिली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

आपण अनेक जण म्हणत असतो आर, शेती म्हणजे काय परवडत नाही, परंतु असं म्हणणाऱ्यांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उत्तर दिलेल आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लाडसांगवी गावचे शेतकरी बाबासाहेब पडूळ यांना पारंपारिक शेतीमधून काही फारसे उत्पन्न मिळत नव्हत, पण डाळिंब शेतीकडे वळल्यानंतर बाबासाहेबांनी अक्षरशः नशीबच बदलून टाकला आहे. ३०० झाडांपासून सुरुवात करून आज त्यांच्याकडे आठ एकरात 1800 झाडांची डाळिंब बाग आहे. आणि याच बागेने यंदा 50 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना दिला आहे. Success story

बाबासाहेब सांगतात की, सुरुवातीला पिढ्यांना पिढ्या चालत आलेली शेती करत होतो. पण मला ही शेती परडवत नव्हती. वर्षाला दहा ते बारा हजार रुपयांचा नफा. एवढावर घर चालवणं कठीण व्हायला लागलं. मग सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून 14 वर्षापूर्वी 300 डाळी झाडांची लागवड केली. त्यानंतर मला हळूहळू यश मिळू लागल.

आज त्यांच्या आठ एकर शेतामध्ये 1800 झाड जोमात उभी आहेत. गेल्यावर्षी 28 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आणि यंदा दर चांगले मिळाल्याने पन्नास लाख रुपये पर्यंत फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

असं थोडंच आहे की शेती केली आणि संकट नाही आली. डाळिंब बाग फक्त लावून चाल नाही, रोगराईच संकट दरवर्षी असतं. तेल्या, प्लेग सारखे आजार झाड खराब करतात. पण बाबासाहेब यांनी हार मानली नाही. न्यूट्रिशन लेव्हलवर लक्ष केंद्रित केलं, योग्य औषधे, वेळेवर फवारणी, तज्ञांचे मार्गदर्शन यावर भर दिला. आणि त्याचं फळ मिळालं.

बाबासाहेब यांचे स्पष्ट मत आहे की, शेती म्हणजे फक्त राबवन नव्हे, तर शहाणपणाचे विचार करणे. माती चाचणी, झाडांच्या गरजा, हवामानाचा अभ्यास, आधुनिक औषध, आंतरपीक आणि सिंचन व्यवस्थापन या सगळ्यांचे संगणमत साधल्यावरच बाग फुलते.

शेतकरी बाबासाहेब पडूळ यांचा संदेश अत्यंत

प्रेरणादायी आहे. यामुळे सध्या नोकरीच्या प्रश्नामुळे युवा वर्गाने देखील शेतकरी कडे वळणे आवश्यक आहे. अशी शेती करून भविष्य व नियोजन करावे लागते. किंवा दोन एकरात महिन्याला पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न काढता येतं, फक्त हे साध्य करण्यासाठी मनापासून काम करावे लागतं. शेतकरी बांधवांनो खरं सांगायचं झाल्यास शेतीतून खूप पैसा मिळतो…. फक्त योग्य दिशा शिस्त आणि आधुनिक चा विचार हवा! आणि अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करत चला.

हे पण वाचा | Success Story : …..आधुनिक शेतीतून शेतकऱ्यांनी कमावला भरघोस नफा

Leave a Comment

error: Content is protected !!