Aadhaar Card Update : सध्या देशात ओळखपत्र संदर्भात मोठे बदल सुरू आहेत आणि यातच आता महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेले आहे. प्रसार माध्यमांच्या अपडेट नुसार, आधार कार्ड च्या नियमात सरकारकडून मोठा बदल करण्यात आलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयांची ओळख हीच केंद्रबिंदू बनला असून, याच्या आधारे अनेक सेवा सध्या नागरिकांना मिळतात. मात्र याच गोष्टीचा गैरफायदा घेत बोगस आधार कार्ड तयार करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले असून, UIDAI ने यावरती लक्ष ठेवत मोठे बदल केलेले आहे. Aadhaar Card Update
नवीन बदल नेमके काय?
सरकारने यावरती ठाम पष्ट मत दिले आहे की आता पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, दहावीचं प्रमाणपत्र, आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्र आधार कार्ड अशी लिंक केले जाणार आहेत. या सर्व डेटाचं इंटरलिंकिंग केलं जाईल आणि त्यानंतरच आधार कार्ड तयार केलं जाईल. यामुळे खोट्या कागदपत्रांवरती आधार घेण्यात अशक्य होणार आहे.
UIDAI कडून काय नवीन पाऊल उचललं गेलं?
UIDAI ने एक नवीन टूल वापरायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे नवीन आधार नोंदणी करताना दिलेल्या कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये वाहन परवाना, मनरेगा जॉब कार्ड, विज बिल, पॅन कार्ड यांची सखोल तपासणी केली जाणार. याशिवाय KYC प्रक्रिया आणखी कडक करण्यात येणार आहे.
कोणत्या कारणामुळे सरकारने घेतला निर्णय?
सध्या आपल्यासमोर अनेक अशा घटना घडत आहेत भारतामध्ये घुसखोर घुसखोरी करून भारताचे कागदपत्र काढलेले आहेत. यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की, बांगलादेशी, रोहिंग्या किंवा इतर परदेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळखपत्र मिळवली आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये अशा गुस्करांचे जाळी पसरले असून त्यांना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी देश विघातक शक्ती कार्यरत असल्याचा समोर आला आहे. रेशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, शाळेचे खोटे दाखले यांच्या आधारे त्यांनी आधार कार्ड मिळवला आहे. हे थांबवण्यासाठी सरकारने आता मोठी मोहीम सुरू केलेली आहे.
आता सामान्य नागरिकांना काय करावे लागणार?
पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड यांसारखे दस्तावेज आपले आधार कार्ड असे लिंक करावे लागणार आहेत. तसेच जर काही लिंकिंग बाकी असेल तर लवकरात लवकर अपडेट करा. नवीन आधार कार्डशी अर्ज करत असाल तर मूळ आणि खरी कागदपत्र द्या. KYC अपडेट करताना कोणतीही चूक होऊन देऊ नका. जर चुकीच्या पद्धतीने आधार मिळवला असेल तर कायदेशीर कारवाई करा.
शेवटी एकच गोष्ट महत्वाची, आधार कार्ड हे तुमचं ओळखीचं शक्तिशाली साधन आहे, त्याचा वापर योग्य पद्धतीने करा
(DISCLAIMER: वरील माहिती ही उपलब्ध सरकारी वृत्तान वर आधारित असून, कोणतीही अधिकृत घोषणा UIDAI कडून केल्यानंतरच अंतिम मानली जावी.)
हे पण वाचा | आता घरबसल्या आधार कार्ड अपडेट करा एकदम फ्री मध्ये, इथून पहा संपूर्ण माहिती