आजच हवामान : राज्य वरती दुहेरी संकट! भारतीय हवामान खात्याचा पुढील चार दिवस 15 जिल्ह्यांना अलर्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update | राज्यातील मागील काही दिवसांपासून हवामान वेगाने बदलत चाललेला आहे. कधी तापमान वाढतंय, कधी वादळी वाऱ्यासह पाऊस, तर कधी अचानक गारपीट. आता पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पुन्हा 24 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात हवामान मोठ्या प्रमाणावर बदलणार असल्याचा इशारा दिलेला आहे. काही ठिकाणी प्रचंड उष्णता, तर काही भागामध्ये गारपिट व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचे संकट निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांना सावधान अत्यंत गरजेचा आहे. Weather Update

शेती विषयक हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

विशेषता: विदर्भात उष्णतेचा कहर वाढणार असून अमरावती, चंद्रपूर, नागपूर या सोबत वर्धा या चार जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. या भागांमध्ये तापमान 45° c च्या आसपास जाण्याची शक्यता असून, दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणार टाळण्याचा सल्ला दिला आहे. या सोबत उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागात येलो अलर्ट दिलेला आहे. 23 एप्रिल च्या तुलनेत दोन ते तीन अंशाने तापमान वाढणार असल्याने उष्माघाताचा धोका निर्माण झालेला आहे.

पावसाचं संकट ही यावेळी हातात हात घालून आला आहे. 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्‍यता असून, 27 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, घाटमाथा आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि झंजावत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्श्वभूमी वरती हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे.

उष्णतेची लाट, पावसाचं झोडपण आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणे, शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. व त्यांचे नुकसान होऊ शकते. फळबाग, भाजीपाला व रब्बीचे शेवटचे पीक यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाच्या बदलाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आत्तापासूनच फळझाडांना आच्छादन देणे, शेती पिकांन वरती औषधी फवारणी करणे आणि योग्य ते रक्षणाचे उपाययोजना करणे सुरू केलेला आहे.

हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पुढील सूचना दिलेल्या आहेत- शक्यतो दुपारी बारा ते चार या वेळेत उघड्यावर जाऊ नका. पाणी अधिक प्रमाणात घ्या. थेट सूर्य प्रकाशापासून बचाव करा, विजांच्या कडकडाट सुरू असताना उघड्यावर किंवा झाडाखाली उभा राहू नका. गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि स्थानिक हवामानाचा सूचना पहा

राज्यभरात विविध प्रकारचे अलर्ट जाहीर झाल्याने प्रशासनाने ही खबरदारी म्हणून उपाय योजना सुरू केलेले आहेत. शालेय, औद्योगिक आणि शेतकरी वर्गांना याबद्दल हवामानाचा फटका बसू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. हवामान 27 नंतर स्थिर होण्याची शक्यता असून, तोपर्यंत नागरिकांनी संयम बाळगणं आवश्यक आहे.

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी ! इतके दिवस पडणार पावसाचा खंड पंजाबराव डख यांचे मोठे भाकीत

Leave a Comment