IMD Weather forecast : देशाच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे देखील चिंतेमध्ये वाढ होत आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढलेले आहे. भारतीय हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आलेला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ व चक्रवादामुळे पुन्हा देशावर एकदा अस्मानी संकट निर्माण झालेले आहे. IMD Weather forecast
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबत अनेक राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या, कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व उत्तर भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मनिपुर, त्रिपुरा, मिझोरम, पश्चिम बंगाल मेघालय, आणि सिक्कीम मध्ये पुढील सात दिवस मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा दिलेला आहे.
उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी बर्फ वृष्टी चा इशारा देखील देण्यात आलेला आहे. तसेच या पार्श्वभूमी वरती पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यासोबत बिहार आणि झारखंड या भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसासह पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन पुढील नियोजन करायचा आहे.