Farmer ID Scheme: केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. सध्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. तसेच त्यातून शेतकऱ्यांना मोफत पाच सुविधा देखील मिळणार आहेत. आज आपण याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा | महाडीबीटी अंतर्गत सौरचलित फवारणी पंप मिळण्यास सुरुवात; तुम्हाला मॅसेज आला का नाही?
फार्मर आयडी म्हणजे काय?
सर्व शेतकरी बांधवांना सर्वात आधी फार्मर आयडी म्हणजे नेमकं काय हे समजून घेणे आवश्यक आहे. फार्मर आयडी म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांचे ओळखपत्र आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती शेतजमिनीचा तपशील आणि शेती संबंधित सर्व महत्त्वाची माहिती असणार आहे. ज्याप्रमाणे आधार कार्ड आहे त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना फार्मर आयडी एक विशिष्ट क्रमांक प्रदान करणार आहे. Farmer ID Scheme
हे पण वाचा | आधार कार्डवर नवीन नियम लागू! सर्वांसाठी जाणून घेणे खूपच महत्त्वाचे..
शेतकरी कार्ड आवश्यक आहे का?
शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा थेट लाभ मिळावा व यात पारदर्शकता निर्माण व्हावे म्हणून शेतकरी कार्ड अतिशय आवश्यक आहे. सरकारने यासाठीच याबाबत निर्णय घेतला आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आपण जाणून घेऊया.
- शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने व्यापक डेटाबेस तयार करणे.
- सरकारी योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत सहज पद्धतीने पोहोचवणे.
- मध्य स्थानी भूमिका कमी करणे.
- शेती विषयी सुविधांचा व योजनेचा जलद गतीने सर्व शेतकऱ्यांना लाभ देणे.
हे पण वाचा | सोनं झालं स्वस्त; सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचे दहा ग्रॅम दर
आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- रहिवाशीच असलेला पुरावा
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास फक्त व्याजातून 20 लाख रुपये मिळतील..
ऑनलाइन पद्धतीने नोंदणी कशी करावी?
शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ऍग्रीस्ट्रिक पोर्टलवर भेट द्यावी लागेल. त्यामध्ये नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नोंदणी झाल्यानंतर आवश्यक माहिती भरा व कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अर्जाची पूर्ण प्रक्रिया करू शकता.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना या तारखेला मिळणार 2,100 रुपये; तुम्हाला मिळणार का नाही?
फार्मर आयडीचे फायदे
- या आयडी अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. कृषी कर्ज सहज उपलब्ध होईल, पिक विमा योजनेचा लाभ मिळेल, अनुदान थेट खात्यात जमा होईल, तसेच विविध सरकारी आर्थिक योजनेचा लाभ याद्वारे दिला जाईल.
- शेती विषयी सुविधा मिळतील जसे की, बियाणे खते खरेदीसाठी विशेष सवलत मिळेल. आधुनिक पद्धतीने शेती उपकरणावर अनुदान आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जाईल.
- बाजारपेठ संबधित लाभ दिला जाईल. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेमध्ये विक्री करण्याची संधी आणि किमान आधारभूत किमतीची हमी मिळेल.
- शेतकरी उत्पादक संघटना व गटांशी जोडणी होईल.
हे पण वाचा | रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करायचे आहे; जाणून घ्या सविस्तर माहिती
अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी?
शेतकरी ओळखपत्र काढताना आणि वापरताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. या योजनेला अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्पष्ट असणे आवश्यक आहेत. अर्जामध्ये भरलेली माहिती कागदपत्राशी जुळणे देखील आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक आधार क्रमांक सोबत लिंक असणे आवश्यक आहे. दरम्यान शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत शेती विषयक सुविधा आणि थेट बाजारपेठेचा लाभ मिळेल. सरकारच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शेती अतिशय सोप्या पद्धतीने व आधुनिक होईल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
Changli mahiti दिलि