Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या. त्यानंतर सरकारने या योजनेची छाननी करण्याचा निर्णय घेतला. छाननी दरम्यान या योजनेतील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर आला आहे.
हे पण वाचा | लडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट! या महिलांचे टेन्शन वाढणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा पाच लाख पेक्षा जास्त झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक स्वर पोस्ट करून दिली आहे. अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असून, यानंतर त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. तसेच पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार सर्व उपयोजना करत असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे यांनी एक्स वर लिहिले आहे की, 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी सुरू करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे कारण खालील प्रमाणे आहेत.
हे पण वाचा | या भागातील 22 हजार लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र; छाननी वेगात सुरू..
यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिला आहेत. त्याचबरोबर वय 21 ते 65 वर्षा दरम्यान नसलेल्या महिलांचा आकडा एक लाख दहा हजार एवढ्या आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी गाडी असलेल्या त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वतःच्या इच्छेने योजनेतून नाव माघार घेणाऱ्या महिलांची संख्या एक लाख 60 हजार एवढी आहे. अशाप्रकारे एकूण अपात्र महिलांची संख्या पाच लाख एवढी होत आहे. अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिले आहे. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता देण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 5 टक्क्यांनी घटली, आणखीन कमी होणार, नेमकं कारण काय?
लाडकी बहीण योजनेचा अनेक ठिकाणी गैरवापर करण्यात आलेला आहे. हिंगोली मध्ये चार पुरुषांनी पडद्याआडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. कारवाईच्या भीतीने या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली आहे. माघारी घेतलेल्या आठ लाभार्थ्यांपैकी चार पुरुष आहेत. आधार कार्डवर महिलांचा फोटो लावून या योजनेचा लाभ त्यांनी घेतला होता. Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ चार लाडक्या भावांनी घेतल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यांमध्ये उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्या चौघांनी प्रत्येकी 9 हजार रुपये उचललेले आहेत. या योजनेअंतर्गत केवळ महिलांना लाभ दिला जातो परंतु काही पुरुषांनी आधार कार्ड वर महिलांचा फोटो लावून बनावट आधार कार्ड तयार करून या योजनेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत या चौघांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहा हप्त्याचे एकूण नऊ हजार रुपये उचलले असून शासनाने कोणाला योजनेचा लाभ घ्यायचा नसेल त्यांनी तसा अर्ज करावा असे आवाहन केले होते त्यावेळी यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको असा अर्ज केला आहे. या योजनेअंतर्गत लुटलेल्या प्रत्येकाकडून नऊ हजार रुपये वसूल करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा