Gold Price News: फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. पण या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासूनच सोन्याचे किमतीत घसरण होत आहे. अर्थसंकल्पानंतर सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आज 4 फेब्रुवारी 2025 रोजी सोनिया आणि चांदीचे दर स्वस्त झाले आहेत. तुम्ही देखील 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेणे खूप आवश्यक असते. आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत तब्बल 400 रुपयाची घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरामध्ये देखील शंभर रुपयाची घसरण झाली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 84 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क मध्ये कोणताही बदल केला नाही. प्रसार माध्यमांमध्ये अनेक चर्चा होत होत्या की सोन्यावरील आयात शुल्क वाढवले जाईल मात्र बजेटमध्ये याबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे कुठेतरी सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. सोन्याचा भाव आता कमी होऊ लागला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अश्यांतता आणि अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे गुंतवणूकदार सोन्याला एकदम सुरक्षित गुंतवणूक गुंतवणूक आहे असे समजून यामध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे त्यांच्या किमती वाढल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर व्याजदर कमी झाले आणि बाजारात अनिश्चितता कायम राहिली तर सोने आणि चांदीचे किंमत आणखीन वाढू शकते. भारतात लग्न सराई सुरू होणार आहे त्यामुळे सोन्याच्या मागणी मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे पुढील काही महिन्यात सोन्याची किंमत आणखीन वाढू शकते असे तज्ञांनी म्हटले आहे.
तुम्ही प्रत्येक वेळेस पाहिले असेल सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानंतर चांदीचे किंमत देखील घसरते. आज देखील चांदीची किंमत थोडीशी घसरली आहे. चांदीच्या दारात 100 रुपयाची घसरण झाली आहे. चांदीची किंमत आज प्रति किलो 99 हजार 300 रुपये एवढी आहे. या आधी चांदीचा भाव 99 हजार चारशे रुपये प्रति किलो एवढा होता. त्यामुळे सोन्या पाठोपाठ चांदीच्या किमती देखील काही प्रमाणात घसरण्यास सुरुवात झाली आहे. चांदी खरेदीदारांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे. Gold Price News
तुमच्या शहरातील आजच्या सोन्याच्या किमती
मुंबई शहरामध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 77040 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84040 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. दिल्लीमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,190 प्रति दहा ग्रॅम एवढी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77040 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84040 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. कोलकत्ता मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77040 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84040 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.