महिलांना ₹2100 रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार ? वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा प्रश्न सध्या वारंवार शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Loan Waiver News

महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी या दोन गोष्टीमुळे महायुती सरकारला भरभरून यश मिळालेले आहे. आता महिलांना 2100 रुपये कधी मिळणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

गेल्या दोन महिन्यापूर्वी राज्याच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असे दावे प्रति दावे केले होते. परंतु आता जवळपास दोन महिन्याचा काळ उठला असून महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत कोणतीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

याच प्रश्नावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यकर्त्यांना दरम्यान उत्तर देत असताना म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं मी कधीही कोणत्याही भाषणामध्ये म्हटलं नाही. माझ्या भाषणामध्ये तुम्ही कधी ऐकलंय का कर्जमाफी देईल? अंथरून पाहून हातपाय पसरायचे असतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्जमाफीची आश्वासनाबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली घोषणा फक्त जाहीरनामा पुरतीच होती का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून आता उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार का? आता याकडे पाहण्यासारखे राहणार आहे. प्रसार माध्यमांमधून अशी देखील व्यक्त केले जात आहे की मार्च अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो.

त्यामुळे लाडक्या बहिणींना ₹2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मार्च महिन्यामध्ये मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Comment