Pm Kisan Yojana : या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार Pm Kisan योजनेचा 19 वा हप्ता, या प्रकारे चेक करा तुमचे यादीत नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : भारत सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती निगडी अवजारे व खते बियाणे खरेदी करण्यास मदत होईल यासाठी काही आर्थिक लाभ देणाऱ्या योजना देखील राबविण्यात येत आहे. त्यातीलच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना भारतातील लहान व सीमित शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देते. ही योजना भारतामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली.

ही योजना भारतातील शेतकऱ्यांमध्ये मोठी लोकप्रिय आहे या योजनेअंतर्गत पात्र असणारा शेतकऱ्यांना ₹6000 प्रति वर्ष देण्यात येत आहे ही मदत शेतकऱ्यांना एक सोबत मिळत नाही तीन समान हफ्त्यांमध्ये प्रत्येकी चार महिन्यांच्या अंतरावर थेट बँकेत जमा करण्यात येतात आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 हप्ते जमा करण्यात आले आहे मागील हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरीत केला आहे तर पुढील हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे तुम्ही जर अर्ज केला असेल तर यादी मध्ये नाव कसे तपासायचे हे आपण जाणून घेणार आहोत. Pm Kisan Yojana

19 वा हप्ता कधी येणार?

प्रसार माध्यमांना मध्ये 19 व्या हप्त्याबाबत वेगवेगळ्या दावे केले जात आहेत परंतु अधिकृत माहिती कोणतीही समोर आलेली नाही मीडिया रिपोर्टनुसार 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे मात्र सरकारने कुठेही माहिती दिलेली नाही त्यामुळे या कोणत्याही गोष्टीवरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये.

याप्रकारे लाभार्थी यादीत नाव चेक करा (PM Kisan Beneficiary List)

  • सर्वात प्रथम Pm Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तिथे लाभार्थी स्थिती या पर्यावरण क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावरील लाभार्थी स्थिती टॅब वरती क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमचा तपशील एंटर करा : तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक टाका त्यानंतर तुमचे स्टेटस पाहू शकता.

Pm Kisan योजनेत मोबाईल नंबर लिंक करा

  • पी एम किसान योजनेच्या अपडेट संबंधित आणि हप्त्या संबंधित सूचना प्राप्त करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी ओटीपी आधारित केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला (CSC ) भेट द्या. किंवा या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून देखील तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करू शकता.

Leave a Comment