Ladki Bahin Yojana: नमस्कार, महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजनेची सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा पहिला हप्ता नेमके कधी जमा होणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्याचा सद्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परिपक्वत्व आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच एका कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला किमान वयाचे 21 वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्यांकडे चार चाकी गाडी नसावी. लाभार्थ्याने आयकर भरलेला नसावा. अशा अनेक अटीसह ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
जुलै महिन्यासाठी रेशन कार्ड यादी जाहीर! 15 जुलैपासून फक्त या नागरिकांनाच मिळणार मोफत रेशन
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली तेव्हा सुरुवातीला अर्ज करण्याची मुदत 15 जुलै पर्यंत ठेवण्यात आली होती मात्र अर्ज करण्यासाठी होणार अधिक गर्दी लक्षात घेत सरकारकडून ही मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत असली तरी या योजनेची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा पहिला हप्ता नेमका कधी जमा होणार याबाबत सर्वच महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातील सर्वच महिलांना हा प्रश्न पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरू करण्यात येणार आणि 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना ही रक्कम मिळू शकते. ऑगस्ट महिन्यानंतर दर महिन्याच्या पंधरा तारखेला पात्र महिलेच्या बँक खात्यात 1500 रुपयाची रक्कम जमा होत राहणार आहे.
CIBIL स्कोर वाढवा ‘याप्रकारे’ लगेच 0 वरून 750 पर्यंत, पहा सिबिल वाढवण्याची सोपी पद्धत
आवश्यक कागदपत्रे
या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. लाभार्थ्यांचे आधार कार्ड असावे, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र/महिलेचे पंधरा वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड, पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणत्याही एक ओळखपत्र, परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा महिलांना त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र यापैकी कोणत्याही एका कागदपत्र देणे आवश्यक आहे.
कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखल, मात्र पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही. बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक आहे. Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे ऑनलाइन अर्ज सुरू, पहा A टू Z माहिती
या योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र आहेत?
- च्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे.
- कुटुंबातील सदस्य कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे.
- निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत मात्र अडीच लाख रुपये उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र आहेत.
- लाभार्थी महिलेंना शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेतला असेल.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड ऑपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत.
- ज्यांच्याकडे सरकारी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहेत.
- आश्या सर्व महिला मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी अपात्र आहेत.
1 thought on “लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये या तारखेला बँक खात्यात होणार जमा! तारीख आणि वेळ निश्चित”