3 दिवसाच्या आत ई-केवायसी करा अन्यथा पीएम किसानचा 17वा हप्ता मिळणार नाही


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Samman Nidhi: नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे बातमी समोर येत आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लवकरच सतरावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार संभाळल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेचा हप्ता जाहीर करण्याच सही केली आहे.

पी एम किसान योजनेची ऑनलाइन ई-केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ का मिळत नाही याबद्दल माहिती जाणून घेतल्यानंतर समोर आले आहे की, या शेतकऱ्याच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक व ई केवायसी केलेली नाहीये. आता सतरावा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या बँक खात्याची ई केवायसी करून घ्यावी. जेणेकरून ते या योजनेचा लाभापासून वंचित राहणार नाही.

अमरावती जिल्ह्यात 2.76 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्माननीय योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र अजूनही 6000 खातेधारकांना बँक खाते आधार कार्ड लिंक किंवा ई केवायसी केलेले नाही. महिन्याभरात या योजनेचा सतरा वेळा त्याचे वितरण होणार आहे. 15 जून पर्यंत ई केवायसी करण्यासाठी डेडलाईन दिलेली आहे. जर तोपर्यंत तुम्ही ई केवायसी केली नाही तर या योजनेचा लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

Mahindra Scorpio N Z8 सिलेक्ट ऑटोमॅटिकचे पुनरावलोकन वाचा, किमतीसाठी सर्वोत्तम डील!

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 5 ते 15 जून या लागवडी लायक क्षेत्र धारक असल्याचा पुरावा, बँक खाते आधार सोबत लिंक व ई केवायसी करण्यासाठी गाव पातळीवर विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची स्वयं नोंदणी व ई केवायसी करण्यासाठी राज्यातील सर्व सीएससी सेंटर व आधार संलग्न बँक खाते उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सूचित करण्यात आले आहे. देशातील सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी तीन बाबी सर्वात महत्त्वाच्या आहेत. यासाठी 5 ते 15 जून दरम्यान गावागावात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी यंत्रणेला सहकार्य करावे. PM Kisan Samman Nidhi

जुने पारंपारिक मिटर होणार बंद..! महावितरण तर्फे प्रीपेड स्मार्ट मीटर लॉन्च

हे काम नाही केले तर लाभापासून राहावा लागेल वंचित…

पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. या योजनेसाठी नोंदणी करणे, ई केवायसी करणे, बँक खाते आधार क्रमांकास जोडणे या बाबीची पूर्तता योजनेच्या सतरावा हप्ता वितरणाच्या आधी करणे महत्त्वाचे आहे. असे न केल्यास लाभापासून वंचित रहावे लागेल.

स्वप्नातील घर होणार पूर्ण! पंतप्रधान आवास योजनेला अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर माहिती

या तीन गोष्टी अनिवार्य

योजनेच्या लाभासाठी भूमी अभिलेख नोंदणी नुसार जमिनीचा तपशील, बँक खाते आधार कार्ड ची लिंक, ई केवायसी या सर्व बाबींची पूर्तता करावी लागेल. भुमिअभिलेख नोंदी अद्यावत नसलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित तलाठी कार्यालयात संपर्क साधावा. याशिवाय त्यांना ई केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटर तसेच इंडियन पोस्ट बँक मार्फत कार्यपुर्तता करावी लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “3 दिवसाच्या आत ई-केवायसी करा अन्यथा पीएम किसानचा 17वा हप्ता मिळणार नाही”

Leave a Comment

error: Content is protected !!