IMD Monsoon News | भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्राच्या मान्सून बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना मान्सूनची आतुरता आहे. 21 मे मध्ये अंदमान मध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनची पुढे वाटचाल जलद गतीने केली आहे. पश्चिम बंगाल मध्ये तयार झालेल्या चक्रीवादळामुळे असे वाटत होते की मान्सून उशिरा आगमन करेल परंतु या चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर झाला नाही. IMD Monsoon News
हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! या तारखेला जमा होणार 17 वा हप्ता
मान्सून महाराष्ट्रात कधीपर्यंत पोहोचण्याची शक्यता
हवामान विभागांनी दिलेल्या माहितीनुसार मानसून 8 जून पर्यंत सिंधूदुर्ग, रत्नागिरी, पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, धाराशिव, लातूर पर्यंत हजेरी लावू शकतो. याच काळामध्ये मान्सून जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टी सह नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये 7 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
परंतु शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी हा देखील प्रश्न शेतकऱ्यांसाठी उपस्थित होत आहे. पेरणी करण्यासाठी कोणता काळ योग हे देखील महत्त्वाचे असते. तज्ञांच्या मते चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका.