Electric Car : देशात इलेक्ट्रिक कार चे सेगमेंट आता व्यापक होत आहे. अनेक कंपन्यांनी या सेगमेंट मध्ये जोरदार वरचढ उघडली. त्यातच जगभरात अनेक प्रयोग सुरू आहेत. आता या इलेक्ट्रिक कारने भारतीय ग्राहकांना नॅनो ची आठवण करून दिली आहे. नॅनो सारखीच छोटी पण स्वस्त इलेक्ट्रिक कारने बाजाराचे लक्ष आकर्षित केले आहे. कोणती आहे ती कंपनी हे आपण पाहूया.
7 डिसेंबर 2023 : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारचे सेगमेंट विस्तारत आहे. टाटा मोटर्स ने यापूर्वी कॉम्पॅंक्ट कारचे स्वप्नं भारतीयांना दाखवले स्वस्त नेनो चा प्रयोग रुजला नाही. पण टाटाने प्रयत्न सोडले नाही. लवकरच टाटा स्वस्तातील इलेक्ट्रिक कार भारतीयांसाठी बाजारात घेऊन येणार आहे. पण जगभरात त्या दृष्टीने प्रयोग सुरू आहेत. इलेक्ट्रिक कार ही येत्या काही काळात गरजेची ठरेल. चिनीच्या बाजारात पण तिथल्या कंपन्या कारचे युग घेऊन येत आहे. अनेक कंपन्यांनी या सेगमेंट मधील गुंतवणूक कित्येक पटीने वाढवली आहे. चीनच्या फर्ट आॅटो वर्क्स ने मायक्रो हेव्ही सेगमेंट वर लक्ष केंद्रित केले आहे. या सेगमेंटमध्ये वाटा वाढवला आहे. बेस्टयुन ब्रँड अंतर्गत कंपनीने शाओमा ही लहान इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली आहे.
किती आहे किंमत
याच महिन्यात इलेक्ट्रिक कारची प्रीसेल सुरू होत आहे.FAW बेस्टयुन शाओमा ची थेटस स्पर्धा वुल्लिंग होंगगुआंगच्या मिनी EV सोबत होत आहे. सध्या ही चीनमध्ये विक्री होणारी मायक्रो कार आहे. बेस्टयुन शाओमाची किंमत 30,000 ते 50,000 युआन म्हणजे भारतीय चलनात जवळपास 3.47 ते 5.78 लाख रुपयांच्या दरम्यान असेल.
दोन मॉडेल बाजारात
FAW बेस्टयुन शाओमा या वर्षी एप्रिल महिन्यात शांघाय येथील ऑटो शोमध्ये चर्चेत आली होती. तिचे हार्डटाॅर आणि कंन्व्हाटिबल असे दोन मॉडेल आहेतं. सध्या हार्ड टॉप व्हेरिएंट ची विक्री करण्यात आली आहे. दुसरे मॉडेल बाजारात कधी येईल याविषयीची चर्चा समोर करण्यात आली नाही. या कारला टच स्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात आले आहे. त्याची स्क्रीन सात इंचाची आहे. डॅश बोबर्ड पण आकर्षक आहे. या कारचे डिझाईन चिनी ग्राहकांच्या पसंतीला आली आहे.
बेस्टयुन शाओमा रेंज
बेस्टयुन शाओमा FAW प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये ईव्ही आणि रेंज एक्सटेंडर डेडिकेटेड चेसिस देण्यात आले आहे. या कारचा व्हेलबेल 2700-3000 एम एम आहे. ईव्हीची रेंज 800 किमी तर एक्सटेंडरची रेंज 1200 किमी होऊन अधिक आहे. दोन्ही फ्लॅटफार्म 800 आर्किटेक्चर चा पाठिंबा मिळतो.
टाटा मोटर्सचा इलेक्ट्रिक ताफा
टाटा मोटर्स ने इलेक्ट्रिक कार बाजारात धडाक्यात सुरुवात केली आहे. नवीन ईव्हि कार बाजारात दाखल होतील. लुक, फिचर, रेंज आणि स्पीड मध्ये या कार जोरदार असतील. यामध्ये सर्वाधिक प्रतीक्षा पंच ईव्हीची आहे. पंच इलेक्ट्रिक कार ची सुरुवात 10 लाख रुपयांपासून होण्याची शक्यता आहे.