तलाठी भरती 2023-जाहिरात


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तलाठी भरती 2023-जाहिरात – तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तलाठी भरती प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आत्ताच नवीन जाहिरात आली आहे. महसूल विभागाची पारूप जाहिरात तयार झाली आहे. जाहिरात मध्ये दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात एकूण 4625 जागांची तलाठी भरती प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. महत्वाचे म्हणजे आम्ही जाहिरात ची PDF ची लिंक सुद्धा दिलेली आहे. यामध्ये जिल्ह्यामध्ये किती पदांची भरती आहे हे आपल्याला समजू शकेल. तसे तलाठी भरतीसाठी ची लेखी परीक्षा कधी होणार आहे हे सुद्धा खाली दिलेल्या माहितीमध्ये नमूद केलेले आहे या संदर्भात सुधारित अधिकृत तालुक्यांची घोषणा लवकरात लवकर

तलाठी भरती 2023-जाहिरात

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत तलाठी भरती गट-क संवर्गातील एकूण-4625 पदांचा सरळ सेवा भरती करिता जमाबंद आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून दिनांक.18 ऑगस्ट 2023 ते दिनांक 12 सप्टेंबर 2023 या कालावधी महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

परीक्षा वार व दिनांक -:: 18 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पदसंख्या:- एकूण -4625 पदसंख्या आहेत

वेतन श्रेणी– 20500-81100

पात्रता :-

  • भारतीय नागिकत्व
  • वयोमर्यादा:- 1 जानेवारी 2023 पर्यंत 18 वर्ष पुर्ण असले पाहिजे

परीक्षा फी – खुला प्रवर्ग-/1000 /मागासवर्गीय प्रवर्ग-/900

  • परीक्षा फी भरल्यास ती तुम्हाला परत मिळणार नाही ( non-refundable)

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया :-

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे. अर्ज करण्याची तारीख लवकरात लवकर जाहीर होईल दिनांक माहितीसाठी वेळोवेळी या साईटला भेट द्या. https://mahabhumi.gov.in

महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे-

  • SSC अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक अहर्ता इत्यादी पुरावा
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असलेला पुरावा
  • आर्थिक दृष्ट्या दुर्लब घटक असलेला पुरावा
  • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक सह वैद्य असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग असलेला पुरावा
  • पात्र माजी सैनिक असलेला पुरावा
  • खेळाडू आरक्षण पात्र असलेला पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी असलेला पुरावा
  • प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी असलेला पुरावा
  • भूकंपग्रस्त आरक्षणासाठी असलेला पुरावा
  • SSC नावात बदल झालेला पुरावा
  • MS-CIT प्रमाणपत्र अथवा शासन मान्य

जिल्हा केंद्र निवड पद्धत:-

  • प्रस्तुत परीक्षा करिता विविध जिल्हा केंद्राचा तपशील https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर या सदरामध्ये उपलब्ध आहे.
  • अर्ज सादर करताना जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
  • जिल्हा केंद्राची निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरूपी रहिवाशीच्या पत्त्याच्या आधारे संबंधित महसूल मुख्यालयाच्या केंद्रावर किंवा नजीकच्या जिल्हा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल.

हे पण वाचा:- इंडियन नेव्ही अग्नीवर भरती आता अर्ज करा

असेच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!